'...नाहीतर शरद पवार यांची जीभ घसरली असेल'; राम शिंदे यांचा निशाणा 

By मुकेश चव्हाण | Published: February 15, 2021 02:00 PM2021-02-15T14:00:43+5:302021-02-15T14:01:41+5:30

जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले.

BJP leader Ram Shinde has criticized NCP president Sharad Pawar | '...नाहीतर शरद पवार यांची जीभ घसरली असेल'; राम शिंदे यांचा निशाणा 

'...नाहीतर शरद पवार यांची जीभ घसरली असेल'; राम शिंदे यांचा निशाणा 

Next

मुंबई/ अहमदनगर: जेजुरी येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून पेटलेले राजकारण आता अधिकच तीव्र झाले आहे. पुतळ्याच्या अनावरणाच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानावरुन भाजपाचे नेते राम शिंदे यांनी निशाणा साधला आहे. 

जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी पवार यांनी नातवाच्या प्रेमापोटी एक वक्तव्य केले. अहिल्‍यादेवींचा राष्ट्रवादीचे आमदार जन्म रोहित पवार यांच्या मतदारसंघात झाला आहे, असं सांगून, नातवाचा मतदारसंघ श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून झाला असल्याची टीका राम शिंदे यांनी केली आहे. 

शरद पवार हे राजकारणात, लोकशाहीत अर्धशतक पूर्ण करणारे नेते आहेत. त्यांच्या तोंडातून जे वाक्य गेले ते अनावधानाने गेले असेल किंवा त्यांची जीभ घसरली असेल, असे मला वाटते. परंतु अहिल्यादेवींचा असा नामोल्लेख करणे ही गंभीर चूक असून हा अवमान आहे,' असल्याची टीका राम शिंदे यांनी केली आहे. 

Web Title: BJP leader Ram Shinde has criticized NCP president Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.