कोपरगावात भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 01:26 PM2019-10-03T13:26:11+5:302019-10-03T13:26:49+5:30

प्रचंड मिरवणुकीने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कोपरगावचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे दाखल केला.

BJP candidate Snehlata Kolhe showcases strong power in Kopargaon | कोपरगावात भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

कोपरगावात भाजपच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

Next

कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या उमेद्वार स्नेहलता कोल्हे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मतदार संघातून भाजपा महायुतीच्या सर्वच मित्र पक्षाच्या महिला, पुरुष अश्या हजारोंच्या संख्येतील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठे शक्तिप्रदर्शन केले. शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीला सुरवात झाली. त्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर त्या नतमस्तक झाल्या. प्रचंड मिरवणुकीने त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कोपरगावचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांच्याकडे दाखल केला.
या मिरवणुकीमध्ये स्नेहलता कोल्हे यांच्या समवेत बिपिन कोल्हे, अमित कोल्हे, सुमीत कोल्हे, विवेक कोल्हे , रेणुका कोल्हे यांच्यासह महायुतीच्या सर्वच मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: BJP candidate Snehlata Kolhe showcases strong power in Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.