कोरोनाला रोखण्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागतील : बाळासाहेब थोरात; राज्यात कडक लॉकडाऊनचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 11:11 AM2021-04-10T11:11:20+5:302021-04-10T11:11:57+5:30

संगमनेर : कोरोना प्रादुभार्वामुळे राज्यात कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. कोरोनाचे हे मानवजातीवरील संकट आहे. त्यामुळे सर्वपक्षीय मतभेद विसरून सर्वांना एकत्र यावेच लागेल. सर्वांनी त्या दृष्टीने तयारी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता राज्यात योग्य ते निर्णय घेतले जातील. प्रसंगी कटू निर्णय घेण्याची वेळ आली तरी ते घेतले जातील. असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.    महसूलमंत्री थोरात शनिवारी (दि. १०) संगमनेरात आले असता येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी बैठकीत आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

Bitter decisions will have to be made to stop Corona: Balasaheb Thorat; Signs of severe lockdown in the state | कोरोनाला रोखण्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागतील : बाळासाहेब थोरात; राज्यात कडक लॉकडाऊनचे संकेत

कोरोनाला रोखण्यासाठी कटू निर्णय घ्यावे लागतील : बाळासाहेब थोरात; राज्यात कडक लॉकडाऊनचे संकेत

Next

 

संगमनेर : कोरोना प्रादुभार्वामुळे राज्यात कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. कोरोनाचे हे मानवजातीवरील संकट आहे. त्यामुळे सर्वपक्षीय मतभेद विसरून सर्वांना एकत्र यावेच लागेल. सर्वांनी त्या दृष्टीने तयारी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता राज्यात योग्य ते निर्णय घेतले जातील. प्रसंगी कटू निर्णय घेण्याची वेळ आली तरी ते घेतले जातील. असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
   महसूलमंत्री थोरात शनिवारी (दि. १०) संगमनेरात आले असता येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी बैठकीत आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

Web Title: Bitter decisions will have to be made to stop Corona: Balasaheb Thorat; Signs of severe lockdown in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.