नगरमध्ये बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायांना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 05:34 PM2019-09-13T17:34:23+5:302019-09-13T17:34:33+5:30

सजविलेल्या रथात विराजमान झालेली बाप्पांची मूर्ती, गणपती बाप्पा मोरया असा जयघोष.. फुले, गुलालाची उधळण, पारंपरिक वाद्यांसह संगीताच्या तालावर तल्लीन होऊन नाचणारी तरुणाई अशा उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात गुरुवारी (दि़१२) नगरकरांनी लाडक्या गणरायांना पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत निरोप दिला़ 

Bappa Moriya's announcement to the people in the city | नगरमध्ये बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायांना निरोप

नगरमध्ये बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायांना निरोप

Next

अहमदनगर: सजविलेल्या रथात विराजमान झालेली बाप्पांची मूर्ती, गणपती बाप्पा मोरया असा जयघोष.. फुले, गुलालाची उधळण, पारंपरिक वाद्यांसह संगीताच्या तालावर तल्लीन होऊन नाचणारी तरुणाई अशा उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात गुरुवारी (दि़१२) नगरकरांनी लाडक्या गणरायांना पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत निरोप दिला़ 
मानाच्या विशाल गणपतीची गुरुवारी सकाळी नऊ वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याहस्ते उत्थापन पूजा होऊन मिरवणुकीला प्रारंभ झाला़ रामचंद्रखुंट ते आडतेबाजार, दाळमंडई, तेलीखुंट, कापड बाजार, अर्बन बँक रोड, नवीपेठ, खामकर चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्लीगेटमार्गे नेप्ती नाक्याजवळील बाळाजीबुवा विहीर या मार्गाने मिरवणूक निघाली़ यंदा १४ मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती़ यातील चार मंडळांनी ढोल-ताशा, लेझीम, बॅण्ड ही पारंपरिक वाद्य वाजविली तर दहा मंडळांनी सीडी साऊंड लावले होते़ त्याचा आवाज डिजे एव्हढा नसला तरी कानठळ्या बसविणारा नक्कीच होता़ जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील व उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ प्रत्येक मंडळासोबत पोलिसांच्या दोन तुकड्या चालत होत्या़ फिरते पथकही मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते़ विसर्जनस्थळी व मिरवणूक मार्गावरील चौकाचौकात पोलीस तैनात होते़ रात्री बारा वाजले तेव्हा नियमानुसार पोलिसांनी मिरवणूक आहे त्या ठिकाणी बंद केली़ त्यानंतर मंडळांनी बाळाजीबुवा विहिरीत मूर्र्तींचे विसर्जन केले़ ं

Web Title: Bappa Moriya's announcement to the people in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.