पारनेरच्या ७९ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:25 AM2021-01-16T04:25:10+5:302021-01-16T04:25:10+5:30

पारनेर : तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८० टक्के मतदान झाले. किन्ही येथे एका उमेदवाराने महिलेस धक्काबुक्की केल्याचा प्रकार वगळता ...

An average of 80% voting for Parner's 79 gram panchayats | पारनेरच्या ७९ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८० टक्के मतदान

पारनेरच्या ७९ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८० टक्के मतदान

Next

पारनेर : तालुक्यातील ७९ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८० टक्के मतदान झाले. किन्ही येथे एका उमेदवाराने महिलेस धक्काबुक्की केल्याचा प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले.

पारनेर ७९ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदानास सकाळी प्रारंभ झाला. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, बालाजी पद‌्मने यांच्यासह अधिकाऱ्यांनी विविध मतदान केंद्रांवर भेटी दिल्या. किन्ही येथील उमेदवाराने एका महिलेस धक्काबुक्की केली. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सुपा येथे सरपंच राजू शेख, सचिन काळे, नामा पवार, दत्तात्रय पवार, सागर मैड, दिलीप पवार, निघोज येथे सचिन वराळ, चित्रा वराळ, सरपंच ठकाराम लंके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्ष सुधामती कवाद, जवळा येथे सरपंच किसन रासकर, शिवाजी सालके, वाघुंडे येथे सरपंच संदीप मगर, दादा शिंदे, टाकळी ढोकेश्वर येथे महेश झावरे, सुनील चव्हाण, बाळासाहेब खिलारी, वडझिरे येथे कामगार नेते शिवाजी औटी, सोमनाथ दिघे, अनिल गंधाक्ते यासह अनेक प्रमुख गावातील मातब्बरांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

Web Title: An average of 80% voting for Parner's 79 gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.