माळी चिंचोरा येथे पाच जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:21 AM2021-03-08T04:21:44+5:302021-03-08T04:21:44+5:30

नेवासा : पाइपलाइनवरून बैलगाडी घातल्याच्या संशयावरून भावासह पाच जणांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा ...

Attempt to kill five people at Mali Chinchora | माळी चिंचोरा येथे पाच जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न

माळी चिंचोरा येथे पाच जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न

Next

नेवासा : पाइपलाइनवरून बैलगाडी घातल्याच्या संशयावरून भावासह पाच जणांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना माळी चिंचोरा (ता.नेवासा) येथे घडली.

याबाबत भाग्यश्री विशाल बोरुडे (रा. माळी चिंचोरा, ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली आहे. माळी चिंचोरा शिवारात शेत गट नंबर ३२१ व ३२२ मध्ये पती विशाल, सासू मीरा, सासरे रमेश व दीर निखिल बोरूडे असे एकत्रित कुटुंबात राहतो. शेजारीच चुलत सासरे दत्तात्रय रंगनाथ बोरुडे हेही कुटुंबीयांसह राहतात. त्यांच्या पाइपलाइनवरून कोणीतरी बैलगाडी घातली. या कारणावरून दत्तात्रय बोरुडे यांनी भाग्यश्री बोरुडे यांच्या घरासमोर येऊन शिवीगाळ करू लागले. त्यांना समजावून सांगत असताना, निखिल यांना दत्तात्रय बोरुडे यांनी लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी झालेला आरडाओरडा एकूण दत्तात्रय यांची पत्नी आशाबाई, मुलगा संकेत लोखंडी फावडे घेऊन आला. त्याने निखिलच्या डोक्यावर फावडे मारून गंभीर जखमी केले. दत्तात्रय यानेही दुसरे फावडे आणून मीरा यांना जीवे मारण्याची धमकी देत, फावडे डोक्यात मारले. त्याही गंभीर जखमी झाल्या. आशाबाई हिनेही मीरा यांना लाथाबुक्याने मारहाण केली. दत्तात्रय यांनी रमेश यांच्या छातीवर फावडे मारल्याने, त्यात तेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादीवरून दत्तात्रय बोरुडे, आशाबाई बोरुडे व संकेत बोरुडे यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भरत दाते करीत आहेत.

Web Title: Attempt to kill five people at Mali Chinchora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.