फरार बोठेला अटक करा, आम्हाला न्याय द्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 04:33 AM2021-03-06T04:33:01+5:302021-03-06T04:33:19+5:30

मृत रेखा जरे यांची आई व मुलाची मागणी 

Arrest the fugitive bal bothe, give us justice; Rekha jare's mother and son demand | फरार बोठेला अटक करा, आम्हाला न्याय द्या 

फरार बोठेला अटक करा, आम्हाला न्याय द्या 

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : तीन महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी बाळ बोठे याला अटक करून आम्हाला न्याय द्या, या मागणीसाठी मृत रेखा जरे यांची आई सिंधुबाई वायकर व मुलगा रुणाल जरे यांनी शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले.
यावेळी माध्यमांशी बोलताना रुणाल जरे म्हणाले, रेखा जरे यांची हत्या होऊन तीन महिने उलटले तरी मुख्य आरोपी बाळ बोठे फरार आहे. हे पोलीस प्रशासनाचे मोठे अपयश आहे. 
  पोलिसांनी पाच आरोपींना अटक करत त्यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. त्यांच्यासाठी मात्र आज एकही नेता पुढे आलेला नाही. 
या हत्याकांडाबाबत जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने विधानसभेत आवाज उठविला नाही. 
पोलिसांनी बोठे याला तातडीने अटक करून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी जरे यांनी केली. बोठे 
मात्र पोलिसांना कसा सापडत 
नाही, त्याला कोण पाठीशी घालत आहे, असा सवाल जरे यांनी उपस्थित केला.

...तसे माझ्या आईसाठीही पुढे या
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अनेक नेत्यांनी आवाज उठविला आहे.  माझी आई समाजासाठी लढत होती. तिची हत्या झाली आहे. या गुन्ह्यातील आरोपी हा कोण आहे हे सर्वांना माहीत आहे. लोकप्रतिनिधींनी तरी आता आवाज उठवावा, अशी मागणी यावेळी जरे यांनी केली.

तृप्ती देसाई यांचा उपोषणाला पाठिंबा
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी जरे कुटुंबीयांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. फरार आरोपी बाळ बोठे याला तत्काळ अटक करावी, त्याला मदत करणाऱ्यांवरही कारवाई करावी, तसेच बोठे याच्या मालमत्ता जप्तीचे आदेश द्यावेत, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोरक्ष आढाव व प्रकाश पोटे यांनी जरे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. बोठे मात्र पोलिसांना कसा सापडत नाही, त्याला कोण पाठीशी घालत आहे, असा सवाल जरे यांनी उपस्थित केला.

Web Title: Arrest the fugitive bal bothe, give us justice; Rekha jare's mother and son demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस