‘अजिंक्य भारत’<bha>;</bha> अजिंक्य रहाणेच्या संगमनेरातील मूळ गावी जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:22 AM2021-01-20T04:22:26+5:302021-01-20T04:22:26+5:30

अजिंक्य याला जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्याने आपल्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी केली. ...

‘Ajinkya Bharat’ <b> bha>; </bha> | ‘अजिंक्य भारत’<bha>;</bha> अजिंक्य रहाणेच्या संगमनेरातील मूळ गावी जल्लोष

‘अजिंक्य भारत’<bha>;</bha> अजिंक्य रहाणेच्या संगमनेरातील मूळ गावी जल्लोष

Next

अजिंक्य याला जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्याने आपल्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी केली. याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. असे त्याचे चुलते, चुलती व चंदनापुरीकरांनी ‘लोकमत’ला सांगितले.

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याचा जन्म संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे त्याच्या मामाच्या गावी झाला आहे. येथेही त्याचे आजोबा राधाकृष्ण गायकवाड, मामा डॉ. गणेश राधाकृष्ण गायकवाड, मामी डॉ. दीपाली गायकवाड, मोठ्या मामी शोभा गायकवाड यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेल्या कामगिरीचे आम्हा सर्वांना कौतुक आहे, असे त्याचे मामा डॉ. गणेश गायकवाड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

कोट

संपूर्ण भारताबरोबरच आमच्यासाठीही आज आनंदाचा दिवस आहे. अजिंक्य रहाणे संगमनेर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील. ग्रामीण भागातील तरुणांना संधी व योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते काय करू शकतात. हे अजिंक्य रहाणे याचे उदाहरण आहे. संधी मिळाल्यावर मी नेतृत्वगुण सिद्ध करू शकतो, हे अजिंक्यने जगाला दाखवून दिले आहे.

बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री

--------

फोटो नेम : १९ अजिंक्य राहणे, १ ,२,

ओळ : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकल्यानंतर रहाणे याच्या संगमनेर तालुक्यातील मूळ गावी चंदनापुरी येथे रहाणे कुटुंबीयांनी एकमेकांना पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला. तसेच त्याच्या घराच्याबाहेर फटाक्यांची आतषबाजीदेखील करण्यात आली.

Web Title: ‘Ajinkya Bharat’ bha>;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.