अहमदनगर जिल्ह्याचे मतदान दीड टक्क्यांनी घटले; सात तालुक्यांत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:16 PM2019-10-23T12:16:35+5:302019-10-23T12:17:08+5:30

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम ६९.४३ टक्के मतदानाची नोंद झाली असून, हे मतदान गतवेळपेक्षा सुमारे दीड टक्क्यांनी घटले आहे. शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, शेवगाव, राहुरी, अहमदनगर, श्रीगोंदा या सात मतदारसंघात मतदान २ ते ६ टक्क्यांनी घटले आहे. तर अकोले, संगमनेर, नेवासा, पारनेर व कर्जत-जामखेड या पाच मतदारसंघात मतदान २ ते ८ अहमदनगर जिल्ह्याचे मतदान दीड टक्क्यांनी घटले; सात तालुक्यांत घट वाढले आहे.

Ahmednagar district polling drops by 1.5%; Decrease in seven talukas | अहमदनगर जिल्ह्याचे मतदान दीड टक्क्यांनी घटले; सात तालुक्यांत घट

अहमदनगर जिल्ह्याचे मतदान दीड टक्क्यांनी घटले; सात तालुक्यांत घट

Next

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम ६९.४३ टक्के मतदानाची नोंद झाली असून, हे मतदान गतवेळपेक्षा सुमारे दीड टक्क्यांनी घटले आहे. शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, शेवगाव, राहुरी, अहमदनगर, श्रीगोंदा या सात मतदारसंघात मतदान २ ते ६ टक्क्यांनी घटले आहे. तर अकोले, संगमनेर, नेवासा, पारनेर व कर्जत-जामखेड या पाच मतदारसंघात मतदान २ ते ८ अहमदनगर जिल्ह्याचे मतदान दीड टक्क्यांनी घटले; सात तालुक्यांत घट वाढले आहे.
सोमवारी जिल्ह्यात १२ मतदारसंघासाठी मतदान झाले. सकाळी मतदानाचा वेग कमी होता. दुपारच्या वेळेत तो वाढला. सायंकाळी ब-याच ठिकाणी पावसाला सुरूवात झाल्याने मतदानात काहीशी घट झाली. अन्यथा गतवेळपेक्षा मतदान वाढले असते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 
जिल्ह्यात एकूण ३४ लाख ७३ हजार ७४३ मतदारसंख्या आहे. त्यातील २४ लाख ११ हजार ६८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात १३ लाख २ हजार ३५४ पुरूष, तर ११ लाख ९ हजार २६८ स्त्री मतदारांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत मतदानाची आकडेवारी जुळवण्याचे काम सुरू होते. गतवेळपेक्षा सात मतदारसंघात वाढलेले मतदान कोणाला फायदेशीर ठरतेकिंवा पाच मतदारसंघातील घटलेले मतदान कोणाला मारक ठरते, याचा निर्णय २४ आॅक्टोबरला होणार आहे. दिग्गजांचे राजकीय भवितव्य यंत्र बंद झाले असून गुरूवारी त्यांचा फैसला होणार आहे. 

Web Title: Ahmednagar district polling drops by 1.5%; Decrease in seven talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.