मुदत संपलेल्या ‘या’ आठ ग्रामपंचायतींवर नेमणार प्रशासक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 03:58 PM2020-07-12T15:58:46+5:302020-07-12T15:59:49+5:30

अहमदनगर जिल्ह्यात जुलैअखेर एकूण ८ ग्रामपंचायतींची मुदत संपत असून त्यावर प्रशासक नेमण्याच्या हालचाली जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून सुरू   आहेत.

Administrators to be appointed on eight expired Gram Panchayats | मुदत संपलेल्या ‘या’ आठ ग्रामपंचायतींवर नेमणार प्रशासक

मुदत संपलेल्या ‘या’ आठ ग्रामपंचायतींवर नेमणार प्रशासक

Next

अहमदनगर : जिल्ह्यात जुलैअखेर एकूण ८ ग्रामपंचायतींची मुदत संपत असून त्यावर प्रशासक नेमण्याच्या हालचाली जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून सुरू   आहेत.

मुदत संपणाºया ग्रामपंचायतीत ५ जामखेड तालुक्यातील, २ राहुरी, तर १ ग्रामपंचायत नेवासा तालुक्यातील आहे. चोभेवाडी, राजेवाडी, नान्नज, पोतेवाडी, गुरेवाडी (सर्व ता. जामखेड), आंबी, आंमळनेर (ता. राहुरी) व बहिरवाडी (ता. नेवासा) या ग्रामपंचायतींची मुदत ३१ जुलैअखेर संपत आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रशासक नियुक्त होणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे शासनाने ग्रामपंचायतींच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक केली जात आहे. जूनअखेर जिल्ह्यात २ ग्रामपंचायतींची मुदत संपली असून तेथे विस्तार अधिकाºयाला प्रशासक म्हणून नेमले आहे. आता या ८ ग्रामपंचायतींवर गटविकास अधिकाºयांकरवी प्रशासक नेमले जाणार आहेत.
 

Web Title: Administrators to be appointed on eight expired Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.