नगरमध्ये माजी सैनिकांनी मारले एकता कपूरच्या प्रतिमेला जोडे; ट्रीपल एक्स सिझन-२ वर बंदीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 10:53 AM2020-06-10T10:53:05+5:302020-06-10T10:54:31+5:30

ट्रीपल एक्स सिझन-२ या वेब सिरीजमध्ये भारतीय सैनिकांच्या घरातील महिलांच्या चारित्र्यावर संशय घेणा-या व लष्कराच्या वर्दीची विटंबनेचे दृश्य दाखवून समाजात विकृती पसरविणा-या फिल्म निर्माती एकता कपूर हिच्या प्रतिमेला जोडे मारून माजी सैनिकांनी निषेध केला.

Add to the image of Ekta Kapoor killed by ex-soldiers; Demand for ban on Triple X Season 2 | नगरमध्ये माजी सैनिकांनी मारले एकता कपूरच्या प्रतिमेला जोडे; ट्रीपल एक्स सिझन-२ वर बंदीची मागणी

नगरमध्ये माजी सैनिकांनी मारले एकता कपूरच्या प्रतिमेला जोडे; ट्रीपल एक्स सिझन-२ वर बंदीची मागणी

Next

अहमदनगर : ट्रीपल एक्स सिझन-२ या वेब सिरीजमध्ये भारतीय सैनिकांच्या घरातील महिलांच्या चारित्र्यावर संशय घेणा-या व लष्कराच्या वर्दीची विटंबनेचे दृश्य दाखवून समाजात विकृती पसरविणा-या फिल्म निर्माती एकता कपूर हिच्या प्रतिमेला जोडे मारून माजी सैनिकांनी निषेध केला. एकता कपूर हिच्यावर गुन्हा दाखल करून या वेब सिरीजवर बंदी आणावी, अशी मागणी करण्यात आली. तपोवन रोड येथे मंगळवारी हे आंदोलन करण्यात आले. 

    जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन व  जिल्हातील माजी सैनिक संघटनांच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी दिला आहे. 

     या आंदोलनात पालवे यांच्यासह निवृती भाबड, दिगंबर शेळके, संभाजी वांढेकर, भाऊसाहेब कर्पे, जगन्नाथ जावळे, भाऊसाहेब देशमाने, मारूती ताकपेरे, रमेश पाचरणे, गोरक्ष काळे, उद्धव थोटे, विनोद परदेशी, बाबासाहेब भोर, जनार्दन जायभाये, बन्सी दारकुंडे, गणेश पालवे, माधव झिरपे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Add to the image of Ekta Kapoor killed by ex-soldiers; Demand for ban on Triple X Season 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.