जिल्हा क्रीडाधिकारी नावंदे यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 04:11 PM2019-08-25T16:11:33+5:302019-08-25T16:11:42+5:30

नगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्यावर राज्य शासनाने केलेली एकतर्फी केलेली कारवाई मागे घ्यावी व त्यांना परत तत्काळ नियुक्ती द्यावी.

The action against the District Sports Officer Nalande should be withdrawn | जिल्हा क्रीडाधिकारी नावंदे यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी

जिल्हा क्रीडाधिकारी नावंदे यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी

Next

अहमदनगर : नगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्यावर राज्य शासनाने केलेली एकतर्फी केलेली कारवाई मागे घ्यावी व त्यांना परत तत्काळ नियुक्ती द्यावी, मागणीसाठी शनिवारी येथील विविध सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत प्रशासनाला निवेदन दिले़
या आंदोलनात जागृत नागरिक मंच, अहमदनगर जिल्हा मागासवर्गीय ओबीसी अल्पसंख्याक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ, मराठा सेवा संघ, जाणीव विद्यार्थी पालक संघटना, बहुजन शिक्षक आघाडी, जिल्हा शिक्षक कृती समिती, उर्जिता सोशल फाउंडेशन आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते़ यावेळी आंदोलकांनी शासनाच्या निर्णयाचा निषेध केला़
यावेळी बोलताना जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे म्हणाले, केवळ काही लाभार्थी व्यक्ती व तथाकथित क्रीडा संघटनाच्या हिताला बाधा आली म्हणून एका शिस्तप्रिय व क्रीडा क्षेत्रात सुधारणा करू पाहणाऱ्या महिला अधिकाºयावर शासनाने कुठलीही शहनिशा न करता कारवाई केली आहे़ जिल्हा क्रीडाधिकारी नावंदे यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही़ एककल्ली जमावापुढे झुकून व राजकीय दबावामुळे ही कारवाई करण्यात आली असून ही बाब भारतीय घटनेला, नैसर्गिक कायद्याला आणि लोकशाहीलाही काळिमा फासणारी आहे़ या प्रकरणात एकतर्फी नव्हे तर दोघांनाही समान संधी देऊन खरीखुरी वास्तवता जाणून पुराव्यासह न्याय निवाडा व्हावा. तसेच येणाºया काळात कुठलाही अधिकारी अशा झुंडशाहीचा बळी पडणार नाही, याची शासनाने दक्षता घ्यावी असे ते म्हणाले़
यावेळी जाणीव विद्यार्थी-पालक संघटनेचे बहिरनाथ वाकळे, बहुजन शिक्षक महासंघाचे रवींद्र पटेकर, टेबल टेनिस खेळाडू धनेश बोगावत आदींनी मनोगत व्यक्त केले़ यावेळी अभिजित वाघ, चंद्रकांत चौगुले, बाळासाहेब वाकचौरे, विलास साठे, कैलास दळवी, राजेंद्र गांधी, असिफ दुलेखान, उर्जिता सोशल फाउंडेशनच्या संध्या मेढे, शरद मेढे आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनाही दिले निवेदन
सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पालकमंत्री राम शिंदे यांची भेट घेऊन नावंदे यांच्यावर झालेली एकतर्फी कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी केली़ यावेळी सुहास मुळे म्हणाले, जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे यांच्यावर झालेली कारवाई चुकीची आहे़ चांगले काम करणाºया अधिकाºयांना अशा पद्धतीने सक्तीच्या रजेवर पाठविणे ही बाब योग्य नाही़ या संदर्भात योग्य ती दखल घ्यावी़ यावर पालकमंत्री यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याचे आश्वासन दिले़

Web Title: The action against the District Sports Officer Nalande should be withdrawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.