हिरडगाव येथील चोरी प्रकरणातील आरोपी दोन महिन्यानंतर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 02:50 PM2020-06-06T14:50:57+5:302020-06-06T14:51:34+5:30

श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील चोरी प्रकरणातील आरोपी गणेश शिवाजी काळे (रा.तांदळी) याला श्रीगोंदा पोलिसांनी आढळगाव शिवारात सापळा रचून पकडले. त्याच्याकडून २५ हजार किमतीच सोन्याचे मनीमंगळसूत्र हस्तगत केले आहे.

The accused in the theft case at Hiradgaon disappeared after two months | हिरडगाव येथील चोरी प्रकरणातील आरोपी दोन महिन्यानंतर गजाआड

हिरडगाव येथील चोरी प्रकरणातील आरोपी दोन महिन्यानंतर गजाआड

googlenewsNext

श्रीगोंदा : तालुक्यातील हिरडगाव येथील चोरी प्रकरणातील आरोपी गणेश शिवाजी काळे (रा.तांदळी) याला श्रीगोंदा पोलिसांनी आढळगाव शिवारात सापळा रचून पकडले. त्याच्याकडून २५ हजार किमतीच सोन्याचे मनीमंगळसूत्र हस्तगत केले आहे. पोलिसांनी शुक्रवारी (५ जून) दुपारी कारवाई केली. 

पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना खबºयाकडून माहिती या आरोपीची माहिती समजली होती.  हिरडगाव येथे ४  एप्रिल रोजी श्रीहरी सकुंडे यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र त्याने चोरले होते.  आरोपी आढळगावला एका सराफाकडे येणार आहे. त्यासाठी  पोलीस हेड कॉन्स्टेबल अंकुश ढवळे, किरण बोराडे, रवी जाधव, संदीप काळ,े राजेंद्र भापकर यांनी सापळा लावून गणेश काळेला पकडले. 

गणेश काळे हा तीन चोरी प्रकरणी पोलिसांना हवा होता. काळे याने यापूर्वी कोणत्या सराफाला चोरीचे सोने विकले आहे. याचा शोध पोलीस घेत आहेत. 

Web Title: The accused in the theft case at Hiradgaon disappeared after two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.