पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:22 AM2021-03-05T04:22:05+5:302021-03-05T04:22:05+5:30

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील बबन महाराज घोडके (वय ५७) यांचे बुधवारी (दि. ३) करमाळा (जि. सोलापूर) येथे ...

Accidental death of Warkaris on their way to Pandharpur | पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचे अपघाती निधन

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचे अपघाती निधन

Next

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील बबन महाराज घोडके (वय ५७) यांचे बुधवारी (दि. ३) करमाळा (जि. सोलापूर) येथे अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यासोबत त्यांचे साडू रमेश गाडेकर (वय ६२, रा. सलाबतपूर, ता. नेवासा) हेही जागीच गतप्राण झाले.

बबन गणपत घोडके व त्यांचे साडू रमेश गाडेकर हे दोघे दुचाकीने पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात होते. यावेळी करमाळा - पंढरपूर रस्त्यावर चौदा टायर मालवाहू ट्रक व त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यात बबन महाराज घोडके व रमेश गाडेकर यांचा जागीच मृत्यू झाला. बबन महाराज घोडके यांच्या पार्थिवावर दहिगावने येथे गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दघ्नेश्वर शिवालयाचे प्रमुख गुरुवर्य कृष्णदेव महाराज काळे यांच्याकडून त्यांनी अध्यात्माचे धडे घेतले होते. त्यांचा अध्यात्मिक अभ्यास व पाठांतर वाखाणण्याजोगे होते. परिसरात त्यांच्या गायनाने भाविक मंत्रमुग्ध होत असत. शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी घोडके कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

--

०४ बबन घोडके, रमेश गाडेकर

Web Title: Accidental death of Warkaris on their way to Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.