पॅरोलवर सुटलेल्या फरार आरोपीस अटक; न्यायालयाने ठोठावली पुन्हा शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 01:38 PM2021-01-10T13:38:34+5:302021-01-10T13:39:00+5:30

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पॅरोल रजा संपल्यावर कारागृहात हजर न होता फरार झाला होता. त्यास जामखेड पोलिसांनी पुणे येथे सापळा रचून पडले. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास पुन्हा एक वर्षाची शिक्षा ठोठावली.

Absconding accused arrested on parole; The court sentenced him again | पॅरोलवर सुटलेल्या फरार आरोपीस अटक; न्यायालयाने ठोठावली पुन्हा शिक्षा

पॅरोलवर सुटलेल्या फरार आरोपीस अटक; न्यायालयाने ठोठावली पुन्हा शिक्षा

Next

जामखेड : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पॅरोल रजा संपल्यावर कारागृहात हजर न होता फरार झाला होता. त्यास जामखेड पोलिसांनी पुणे येथे सापळा रचून पडले. आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास पुन्हा एक वर्षाची शिक्षा ठोठावली.

रामकिसन उत्तम साठे (वय ५०, रा.जवळके, ता.जामखेड) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रामकिसन साठे यास सेशन कोर्ट अहमदनगर यांनी ३०२ च्या गुन्ह्यात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. शिक्षा भोगत असताना सदर आरोपी हा आपल्या मूळगावी जवळके येथे पॅरोलवर सुटला होता. पॅरोलची रजा संपल्यानंतर तो कारागृहात हजर न होता फरार झाला होता. त्यावरून येरवडा जेल येथील पोलिसांनी जामखेड पोलिसात गुन्हा दाखल केलेला होता.

    ७ जाने रोजी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना रामकिसन हा विठ्ठलवाडी, देहू रोड, ता.हवेली, जि.पुणे येथे आपली ओळख लपवून राहत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार गायकवाड यांनी पुणे पोलिसांच्या मदतीने त्या पत्त्यावर सापळा रचून रामकिसन साठे यास ताब्यात घेतले. ८ जानेवारी रोजी त्यास जामखेड येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता न्यायालयाने पुन्हा एक वर्षाची शिक्षा सुनावली.

 

Web Title: Absconding accused arrested on parole; The court sentenced him again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.