माजी महापौर अभिषेक कळमकर शिवसेनेच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:00 PM2019-10-07T12:00:29+5:302019-10-07T12:01:22+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या भगवा झेंडा असलेल्या पोस्ट रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्यामुळे कळमकर हे सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 

Abhishek,kalamkar,politic,ahmednagar | माजी महापौर अभिषेक कळमकर शिवसेनेच्या वाटेवर

माजी महापौर अभिषेक कळमकर शिवसेनेच्या वाटेवर

Next

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या भगवा झेंडा असलेल्या पोस्ट रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. त्यामुळे कळमकर हे सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 
कळमकर हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसपासून अलिप्त आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यानंतर कळमकर-जगताप यांच्यात चांगलेच राजकारण पेटले होते. मात्र त्यांच्यामध्ये समेट झाल्याचे दोन्ही गटाकडून सांगण्यात येत होते. दरम्यान संग्राम जगताप यांना नगर शहर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते प्रचारापासून अलिप्त आहेत. दरम्यान त्यांच्या भगव्या पोस्ट व्हायरल झाल्याने कळमकर हे शिवसेनेत गेल्याची शहरात चर्चा आहे. आपण लवकरच राजकीय भूमिका जाहीर करू, असे अभिषेक कळमकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दादा कळमकर हे रयत शिक्षण संस्थेवर आहेत. तसेच ते पवारांचेही विश्वासू आहेत. त्यांची भूमिका मात्र समजू शकली नाही.
दरम्यान, बुधवारी (दि.९) पारनेर, नगर, श्रीरामपूर, संगमनेर येथे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या प्रचार सभा आहेत. नगरच्या सभेत कळमकर हे सेनेत प्रवेश करण्याची चर्चा राजकीय गोटात आहे. 

Web Title: Abhishek,kalamkar,politic,ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.