नगर जिल्ह्यात आज नवे ५४ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले; तर १२६ रुग्णांची कोरोनावर मात;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 01:43 PM2020-07-18T13:43:04+5:302020-07-18T13:43:46+5:30

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये शनिवारी (१८ जुलै) सकाळी ५४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५३८ इतकी झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९२० इतकी झाली आहे.

54 new corona patients were found in Nagar district today; 126 patients overcome corona; | नगर जिल्ह्यात आज नवे ५४ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले; तर १२६ रुग्णांची कोरोनावर मात;

नगर जिल्ह्यात आज नवे ५४ कोरोनाबाधीत रुग्ण आढळले; तर १२६ रुग्णांची कोरोनावर मात;

Next

अहमदनगर : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये शनिवारी (१८ जुलै) सकाळी ५४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५३८ इतकी झाली आहे. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९२० इतकी झाली आहे.

शनिवारी कोरोनाबाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये  नगर शहरातील १० जणांचा समावेश आहे. त्यात मार्केट यार्ड ३, नालेगाव १, केडगाव १, भिस्तबाग चौक १, सूडके मळा १, रेल्वे स्टेशन १, रंगार गल्ली १, बागडपट्टी १  जणांचा समावेश आहे. तर श्रीरामपूर ४ (शहर २, बेलापूर ०१, शिरसगाव ०१,). कर्जत २ (शहर १, माहीजळगाव १). अकोले ४ (शहर ३, लहीत १), जामखेड २ (सोनेगाव १, साकत १). नगर ग्रामीण ३ (निंबलक १, घोस्पुरी १, निमगाव घाणा १). पाथर्डी १, शेवगाव १० (शहर ५, मुंगी ५). नेवासा तालुक्यातील सोनई येथे ३. पारनेर -९ (लोणीमावळा ३, पिंपळगाव रोठा २, कजुर्लेहर्या १, कुंभारवाडी १, वडनेर बुद्रुक १, खडकवाडी १). संगमनेर ६ (गुंजाळवाडी ३, कुरण ३) अशा रुग्णांचा समावेश आहे.

सध्या जिल्ह्यात ५४० जणांवर उपचार सुरू आहेत. ९२० रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १४९३ झाली असून कोरोनामुळे ३५ जणांचा मृत्यू झाला आहे, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी सांगितले.  
 

Web Title: 54 new corona patients were found in Nagar district today; 126 patients overcome corona;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.