प्रशासनाच्या रेकॉर्डवर ५२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:19 AM2021-04-14T04:19:43+5:302021-04-14T04:19:43+5:30

अहमदनगर : गेल्या चार दिवसांपासून दररोज ४० ते ४५ जणांवर अंत्यसंस्कार होत असताना जिल्हा आरोग्य यंत्रणा मात्र वास्तव आकडेवारी ...

52 killed on administration records | प्रशासनाच्या रेकॉर्डवर ५२ जणांचा मृत्यू

प्रशासनाच्या रेकॉर्डवर ५२ जणांचा मृत्यू

Next

अहमदनगर : गेल्या चार दिवसांपासून दररोज ४० ते ४५ जणांवर अंत्यसंस्कार होत असताना जिल्हा आरोग्य यंत्रणा मात्र वास्तव आकडेवारी लपवत असल्याचे दिसून आले. चार ते पाच दिवसांत दीडशे जणांवर अंत्यसंस्कार झाल्यानंतर प्रशासनाने गेल्या दोन दिवसांत ५२ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे. मंगळवारी २६५४ इतके रुग्ण बाधित झाले आहेत. एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचे हे रेकॉर्ड ठरले आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्यांची संख्याही वाढली असून, ती १४ हजार २६४ इतकी झाली आहे.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी ३१ जणांचा, तर मंगळवारी २१ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे दोन दिवसांत ५२ जणांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ६५१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५८२ आणि अँटिजेन चाचणीत १४२१ रुग्ण बाधित आढळले. अँटिजेन चाचणी सर्वाधित होत असल्याचेही यातून दिसून आले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ११८, अकोले ७२, जामखेड १९, कर्जत ४४, कोपरगाव ०९, नगर ग्रामीण ३०, नेवासा ०७, पारनेर ४५, पाथर्डी ३६, राहता ३०, राहुरी ११, संगमनेर ९८, शेवगाव २८, श्रीगोंदा २८, श्रीरामपूर ३६, कॅंटोन्मेंट बोर्ड ३०, मिलिटरी हॉस्पिटल ०७ इतर जिल्हा इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा २९८, अकोले ५, जामखेड ५, कर्जत ६, कोपरगाव १०, नगर ग्रामीण ३५, नेवासा १९, पारनेर ४, पाथर्डी ३, राहाता ८१, राहुरी १४, संगमनेर ३०, शेवगाव ०२, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर २५, कॅंटोन्मेंट बोर्ड २७ आणि इतर जिल्हा ७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजेन चाचणीत आज १४२१ जण बाधित आढळून आले. मनपा ६०, अकोले ६८, जामखेड ०९, कर्जत ११२, कोपरगाव २७५, नगर ग्रामीण ४०, नेवासा ८८, पारनेर ७०, पाथर्डी ७५, राहाता १०४, राहुरी १२६, संगमनेर ९१, शेवगाव ६२, श्रीगोंदा ८५, श्रीरामपूर १३९, कॅन्टोन्मेंट बोर्ड १४ आणि इतर जिल्हा ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

------------

१३५२ जणांना घरी सोडले

मंगळवारी घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर ५६८, अकोले ५२, जामखेड ०२, कर्जत ०२, कोपरगाव ६१, नगर ग्रामीण ९०, नेवासा १७, पारनेर १०, पाथर्डी ४५, राहाता १९५, राहुरी ७७, संगमनेर ९७, शेवगाव २०, श्रीगोंदा ५, श्रीरामपूर ७५, कॅन्टोन्मेंट २४ आणि मिलिटरी हॉस्पिटल १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

-------------------

कोरोना स्थिती

झालेली रुग्णसंख्या : १,०५,१०१

उपचार सुरू असलेले रुग्ण:१४२६४

मृत्यू : १३३४

एकूण रुग्णसंख्या : १,२०,६९९

Web Title: 52 killed on administration records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.