कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जनता कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद; जनजीवन ठप्प; महामार्गावरही शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 11:14 AM2020-03-22T11:14:31+5:302020-03-22T11:15:21+5:30

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी (२२ मार्च) जनता कर्फ्यू लागू केला आहे. या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. आज सकाळपासून महामार्गावर शुकशुकाट जाणवत होता. सर्वांनी घरीच राहणे पसंत केले. महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. रस्त्यावर दिसणा-या वाहने, नागरिकांची चौकशी पोलीस करताना दिसत होते. 

5 percent response to public curfew to prevent Corona spread; Life Stops; Happy on the highway too | कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जनता कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद; जनजीवन ठप्प; महामार्गावरही शुकशुकाट

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जनता कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद; जनजीवन ठप्प; महामार्गावरही शुकशुकाट

Next

अहमदनगर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी (२२ मार्च) जनता कर्फ्यू लागू केला आहे. या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कर्फ्यूला १०० टक्के प्रतिसाद मिळाला आहे. आज सकाळपासून महामार्गावर शुकशुकाट जाणवत होता. सर्वांनी घरीच राहणे पसंत केले. महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. रस्त्यावर दिसणा-या वाहने, नागरिकांची चौकशी पोलीस करताना दिसत होते. 
राहुरी तालुक्यात सकाळी पावणेसहा वाजेपासून शुकशुकाट दिसत होता. संगमनेर तालुक्यातून जाणाºया नाशिक-पुणे महामार्गावर रोजच्या वर्दळ नव्हती. मिरजगावमध्ये नगर-सोलापूर रोड ठप्प झाला होता. बोधेगाव येथे १०० प्रतिसाद मिळाला. शेवगाव-गेवराई महामार्गावरील सर्व वाहतूक थांबली होती. सोनई, कुकाणा, शहरटाकळी, अळकुटी, राजूृर, कळस, पारनेर,देवळाली प्रवरा येथे कडकडीत बंद होता. नगर-औरंगाबाद महामार्ग, नगर-दौंड महामार्ग, नगर-कल्याण महामार्ग, नगर-मनमाड महामार्ग, नगर-पुणे महामार्ग, नगर-पाथर्डी महामार्गा, नगर-जामखेड मार्गावरील सर्व वाहतूक १०० टक्के बंद होती.  ग्रामीण भागातील सर्वच गावात शुकशुकाट होता. 

Web Title: 5 percent response to public curfew to prevent Corona spread; Life Stops; Happy on the highway too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.