चार हजारांच्या इंजेक्शनची 18 हजाराला विक्री; दोघांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 11:13 AM2021-04-14T11:13:09+5:302021-04-14T11:14:42+5:30

अहमदनगर: रेमडेसीविर इंजेक्शनची काळ्या बाजारातून विक्रीचे भिंगारचे प्रकरण ताजे असतानाच केडगाव येथील खाजगी कोव्हिड सेंटरमध्ये काम करणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांकडून या  इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे.

4,000 injections sold for 18,000; Ahmednagar: Remedicivir injection filed against both | चार हजारांच्या इंजेक्शनची 18 हजाराला विक्री; दोघांविरोधात गुन्हा दाखल

चार हजारांच्या इंजेक्शनची 18 हजाराला विक्री; दोघांविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अहमदनगर: रेमडेसीविर इंजेक्शनची काळ्या बाजारातून विक्रीचे भिंगारचे प्रकरण ताजे असतानाच केडगाव येथील खाजगी कोव्हिड सेंटरमध्ये काम करणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांकडून या  इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे.

 4 हजार रुपयांचे रेमडेसिवीर इंजेक्शन तब्बल १८ हजार रुपयांना विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका महिला नर्सचा समावेश आहे. ईशा राजू जाधव, शुभम विजय नांदुरकर (रा. बुर्‍हाणनगर ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शुभम नांदुरकर याला पोलिसांनी बुधवारी पहाटे अटक केली आहे. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतिश शिरसाठ यांच्या पथकाने नालेगाव परिसरात मंगळवारी मध्यरात्री ही कारवाई केली.

केडगाव येथील खाजगी कोव्हिड सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी काळ्याबाजारात चढ्या भावाने भावाने रेमडेसिवीरची विक्री करत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. या विक्रीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी एक डमी ग्राहक तयार करून शहरातील नालेगाव परिसरातील गाडगीळ पटांगणात सापळा लावला. आरोपी त्याठिकाणी एक रेमडेसिवीर इंजेक्शन घेऊन येताच पोलिसांनी त्याला  रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून एक इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे. आरोपी हे मृत कोव्हिड रुग्णांच्या नावावर रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करून ते चढ्या भावाने विक्री करत होते. हे इंजेक्शन केडगाव येथील खाजगी कोव्हिड सेंटरच्या संलग्न असलेल्या मेडिकल मधून खरेदी करत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

Web Title: 4,000 injections sold for 18,000; Ahmednagar: Remedicivir injection filed against both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.