४ हजार रुपयांची लाच : अकोले तहसील कार्यालयातील कारकून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 07:15 PM2019-06-18T19:15:49+5:302019-06-18T19:16:52+5:30

येथील तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून आज दुपारी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला.

4 thousand rupees bribe: Akole tehsil office workers arrested | ४ हजार रुपयांची लाच : अकोले तहसील कार्यालयातील कारकून अटक

४ हजार रुपयांची लाच : अकोले तहसील कार्यालयातील कारकून अटक

googlenewsNext

अकोले : येथील तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून आज दुपारी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात अडकला. कारकून निवृत्ती मारुती भालचिम यास अटक करण्यात आली आहे.
२०१७ मध्ये खरेदी केलेल्या जमिनीची चुकीची लागलेली नोंद दुरुस्त करण्यासाठी ४ हजार रूपयांची लाच घेताना अकोले तहसिलचे अव्वल कारकून भालचिम यांना लाचलुचपत अहमदनगर विभागाचे पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे.
तक्रारदार यांनी २०१७ मध्ये नव्याने खरेदी केलेल्या जमिनीचे फेरफार मध्ये झालेली चुकीची नोंद दुरुस्तीसाठी तलाठी लिंगदेव यांनी तहसील कार्यालयात पाठविलेल्या महसूल जमीन अधिनियम कलम १५५ प्रमाणेच्या प्रकरणाचा निकाल देण्यासाठी आरोपी अव्वल कारकून निवृत्ती मारुती भालचिम,( वय ४३ ) रा.धुमाळवाडी ता.अकोले यांनी दिनांक १८/०६/२०१९ रोजी तडजोडी अंती ४००० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.
लाचलुचपत पोलिस अधिक्षक सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस निरीक्षक दिपक करांडे, तनवीर शेख, सतिष जोशी, रमेश चौधरी, प्रशांत जाधव, राधा खेमनर, चालक अशोक रक्ताटे यांच्या पथकाने सापळा लावून रंगेहाथ पकडले.

Web Title: 4 thousand rupees bribe: Akole tehsil office workers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.