नगर जिल्ह्यात कोरोनाचे आज ३४ नवे रुग्ण; १२३ रुग्णांना डिस्चार्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 05:09 PM2020-08-02T17:09:34+5:302020-08-02T17:10:17+5:30

अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी (१ आॅगस्ट) सायंकाळी सहा वाजल्यापासून रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत ३४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता १ हजार ७०२ इतकी झाली आहे.

34 new corona patients in Nagar district today; Discharge to 123 patients | नगर जिल्ह्यात कोरोनाचे आज ३४ नवे रुग्ण; १२३ रुग्णांना डिस्चार्ज

नगर जिल्ह्यात कोरोनाचे आज ३४ नवे रुग्ण; १२३ रुग्णांना डिस्चार्ज

Next

अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी (१ आॅगस्ट) सायंकाळी सहा वाजल्यापासून रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत कोरोनाच्या रूग्ण संख्येत ३४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाºया रुग्णांची संख्या आता १ हजार ७०२ इतकी झाली आहे.
 
जिल्ह्यात रविवारी १२३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ३ हजार ७६२ इतकी झाली.   शनिवारी सायंकाळपासून आज दुपारपर्यंत २४ रुग्ण बाधित आढळून आले होते. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, संगमनेर ५, पाथर्डी २, नगर ग्रामीण १, कॅन्टोन्मेंट १ आणि कोपरगाव येथील १ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय, महानगरपालिका हद्दीतील १० रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत बाधित आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत ७८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

          दरम्यान, रविवारी एकूण १२३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा ५२, संगमनेर २, राहाता ५, पाथर्डी १४, नगर ग्रामपंचायत ७, श्रीरामपूर ५, नेवासा ११, श्रीगोंदा १०, पारनेर ३, राहुरी १, शेवगाव १, कोपरगाव ८, जामखेड ३, इतर जिल्ह्यात १ अशा रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
 

Web Title: 34 new corona patients in Nagar district today; Discharge to 123 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.