उपचार घेणारे रुग्ण २६ हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:22 AM2021-05-07T04:22:47+5:302021-05-07T04:22:47+5:30

अहमदनगर : कोरोनावाढीचा वेग सलग दुसऱ्या दिवशीही कायम आहे. बुधावारी दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक झाल्यानंतर गुरुवारीही ४,१३९ जणांचा कोरोना चाचणी ...

26,000 patients undergoing treatment | उपचार घेणारे रुग्ण २६ हजार पार

उपचार घेणारे रुग्ण २६ हजार पार

googlenewsNext

अहमदनगर : कोरोनावाढीचा वेग सलग दुसऱ्या दिवशीही कायम आहे. बुधावारी दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक झाल्यानंतर गुरुवारीही ४,१३९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या २६ हजार ३२७ इतकी झाली आहे. २४ तासांत ३३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर करण्यात आली आहे.

जिल्ह्यात गुरुवारी २ हजार ८९३ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६९ हजार २४८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ८५.५७ टक्के इतके आहे. गुरुवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १,९५१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २,१४० आणि अँटिजन चाचणीत १,०४८ रुग्ण बाधित आढळले. ११ तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या ही दोनशेच्या वर आहे, त्यापैकी पाच तालुक्यांतील रुग्णसंख्या तीनशेच्या वर आहे. नगर शहर, श्रीगोंदा, नगर तालुका, पारनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, कोपरगाव, राहाता, राहुरी, संगमनेर या तालुक्यांत सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली आहे.

----

बरे झालेली रुग्णसंख्या : १,६९,२४८

उपचार सुरू असलेले रुग्ण : २६,३२७

मृत्यू : २,२०६

एकूण रुग्णसंख्या : १,९७,७८१

------------

Web Title: 26,000 patients undergoing treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.