पारनेरच्या बिनविरोध ग्रामपंचायतींना २५ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:23 AM2021-04-23T04:23:29+5:302021-04-23T04:23:29+5:30

पारनेर : बिनविरोध निवडणूक करा, ग्रामपंचायतीस २५ लाखांचा निधी देतो, असे आवाहन करणाऱ्या आ. नीलेश लंके यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींना ...

25 lakh fund to Parner's unopposed gram panchayat | पारनेरच्या बिनविरोध ग्रामपंचायतींना २५ लाखांचा निधी

पारनेरच्या बिनविरोध ग्रामपंचायतींना २५ लाखांचा निधी

Next

पारनेर : बिनविरोध निवडणूक करा, ग्रामपंचायतीस २५ लाखांचा निधी देतो, असे आवाहन करणाऱ्या आ. नीलेश लंके यांनी बिनविरोध ग्रामपंचायतींना निधी मंजूर केला आहे. त्यांनी दिलेला शब्द पाळला, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान आ. लंके यांनी मतदारसंघातील नागरिकांना बिनविरोध निवडणुका करण्याचे आवाहन केले होते. बिनविरोध निवडणूक करणाऱ्या ग्रामपंचायतीस २५ लाखांचा निधी देतो, असे आश्‍वासनही लंके यांनी दिले होते. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लंके यांच्या आवाहनावर शंका उपस्थित करीत इतका मोठा निधी कोणी देऊ शकत नाही, हा राजकीय स्टंट असल्याची टीका केली होती. त्यावेळी लंके यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मी दिलेला शब्द पाळणारा आहे. वाचाळवीर नाही, असे सांगितले होते.

लंके समर्थकांच्या दाव्यानुसार तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी हंगे, शिरापूर, रांधे, कारेगाव, वेसदरे, पिंप्री पठार, जाधववाडी, भोयरे गांगर्डा व पळसपूर या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. नगर तालुक्यातील अकोळनेर ही ग्रामपंचायतीही बिनविरोध झाली. लंके यांच्या आवाहनास प्रतिसाद देत अनेक गावांमध्ये सकारात्मक वातवरण होते. मात्र, विरोधकांनी खोडा घातल्याने पन्नास टक्के ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध होऊ शकल्या नाहीत. पाबळ, जातेगाव, वडगाव दर्या, माळकूप ,डिकसळ, पठारवाडी या गावांमध्ये एका उमेदवाराने माघार न घेतल्याने निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. बिनविरोध निवडणुकीच्या लंके यांच्या आवाहनामुळे २१० ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले होते.

प्रत्येकी २५ लाख निधी मंजूर झालेली गावे व निधी पुढीलप्रमाणे : पाबळ तळेवाडी ते पांढरकरवस्ती रस्ता १५ लाख, जवळा : जवळा ते गाडीलगाव रस्ता करणे २५ लाख, पळसपूर येथे स्मशानभूमी सुशोभीकरण २५ लाख, शिरापूर येथे उचाळे वस्ती शिरापूर रस्ता करणे २५ लाख, हंगे येथे सामाजिक सभागृह बांधणे ५० लाख, भोयरे गांगर्डा येथे गजाबाई मुक्ताबाई मंदिर पेव्हर ब्लॉक बसविणे २५ लाख, कारेगाव चारंगेश्‍वर मंदिर सभागृह १५ लाख तसेच मुक्ताबाई मंदिर पेव्हर ब्लॉक १० लाख, पिंप्रीपठार येथे भैरवनाथ मंदिर सभामंडप २५ लाख, वेसदरे येथे सांस्कृतिक भवन २५ लाख, जाधववाडी स्मशानभूमी १० लाख तसेच प्रवेशद्वार १५ लाख, रांधे येथे रांधूबाई सभामंडप १५ लाख, मस्जिद सुशोभीकरण १० लाख, देवसवडे येथे टेकडवाडी ते काळेवाडी घाट २५ लाख, राळेगण थेरपाळ येथे डोमेवस्ती ते खंडोबावस्ती रस्ता १५ लाख, कडूस येथे वाघाजाई मंदिर सभामंंडप ५ लाख, नांदूरपठार येथे श्रीकृष्ण मंदिर सुशोभीकरण ५ लाख, बाबुर्डी बेंद, ता. नगर गावठाण ते शिवरस्ता २५ लाख, पिंप्रीघुमट ते हंंडेवस्ती रस्ता नळकांडी पुलासह तयार करणे २० लाख, अकोळनेर गावांतर्गत काँक्रिटीकरण १० लाख, देऊळगाव सिद्धी सांस्कृतिक सभागृह बांधकाम ५० लाख, बाबुर्डी घुमट रस्ता २० लाख, नांदगाव येथे होलट वस्ती ते कोलबेट रस्ता १० लाख, हिंगणगाव येथे कुरणमळा रस्ता २५ लाख.

Web Title: 25 lakh fund to Parner's unopposed gram panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.