संगमनेरात ११०० किलो गोमांस जप्त; मुंबईतील एकाविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 06:14 PM2020-07-10T18:14:58+5:302020-07-10T18:16:41+5:30

नाशिक-पुणे महामार्गावर वाहनाची तपासणी केली असता त्यात ११०० किलो गोमांस आढळून आले. चारचाकी वाहन, गोमांस असा एकूण ५ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल संगमनेर पोलिसांनी जप्त केला आहे.

1100 kg beef seized at Sangamnera; Filed a case against one in Mumbai | संगमनेरात ११०० किलो गोमांस जप्त; मुंबईतील एकाविरोधात गुन्हा दाखल

संगमनेरात ११०० किलो गोमांस जप्त; मुंबईतील एकाविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

संगमनेर : गोमांस वाहतूक होत असलेल्या चार चाकी वाहनाचे चाक तुटल्याने ते रस्त्याच्या मध्येच चालकाने उभे केले होते. गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशय आल्याने त्यांनी या वाहनाची तपासणी केली असता त्यात गोमांस आढळून आले. चारचाकी वाहन व ११०० किलो गोमांस असा एकूण ५ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

 शुक्रवारी (१० जुलै) पहाटे नाशिक-पुणे महामार्गावर चैतन्य पेट्रोलपंपाजवळ पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी  चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अब्दुुल रहेमान अली मोहम्मद खान ( वय ३८, रा. अंधेरी ईस्ट, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे.

 पोलीस नाईक शिवाजी सोपान डमाळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर चैतन्य पेट्रोलपंपाजवळ आले असता त्यांना एका पिकअप या चारचाकी वाहनाचे (एम. एच. २०, ई. जी. ३६३५) चाक तुटून ते चालकाने रस्त्याच्या मध्येच उभे केल्याचे दिसले. संशय आल्याने पोलिसांनी या वाहनाची तपासणी केली असता त्यात गोमांस व जनावरांचे आतडे आढळून आले होते.

Web Title: 1100 kg beef seized at Sangamnera; Filed a case against one in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.