10 कोटीच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण : 4 तासांत सुटका, 4 तरुण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:17 PM2019-08-10T12:17:32+5:302019-08-10T12:18:28+5:30

दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या बारा वर्षांच्या मुलाची शुक्रवारी (दि़९)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासांत सुटका करून चौघा आरोपींना पाठलाग करून अटक केली.

10 million for kidnapping: 4 hours in jail, 4 young detained | 10 कोटीच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण : 4 तासांत सुटका, 4 तरुण अटकेत

10 कोटीच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण : 4 तासांत सुटका, 4 तरुण अटकेत

Next

अहमदनगर / संगमनेर : दहा कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण झालेल्या बारा वर्षांच्या मुलाची शुक्रवारी (दि़९)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या चार तासांत सुटका करून चौघा आरोपींना पाठलाग करून अटक केली. विरेश शामराव गिरी (वय ३५ रा. साईश्रद्धा कॉलनी, संगमनेर), जनार्धन खंडू बोडखे (वय १९ रा. पंचवटी, नाशिक), सचिन पोपट लेवे (वय १९ रा. सोमेश्वर बारदण फाटा, नाशिक) व मयूर उर्फ पंकज प्रकाश उदावंत (वय २१ रा. साईश्रद्धा चौक, संगमनेर) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.
संगमनेर येथील प्रसिद्ध व्यापारी प्रकाश फुलचंद कटारिया (वय ६५ रा. वृंदावन कॉलनी मालपाणी प्लाझा) यांचा बारा वर्षांचा नातू दक्ष महेश कटारिया हा शुक्रवारी सकाळी ७ वाजता शाळेत जात असताना त्याचे वरील चौघा आरोपींनी अपहरण केले. याबाबत कटारिया यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. आरोपींनी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता कटारिया यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून दहा कोटींच्या खंडणीची मागणी केली. तसेच पैसे कोठे घेऊन यायचे हे सायंकाळी ७ वाजता फोन करून सांगतो असा मेसेजमध्ये उल्लेख होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार त्यांचे पथक व संगमनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांनी तोपर्यंत आरोपींचा शोध सुरू केला होता. दरम्यान आरोपींनी दक्ष कटारिया याला संगमनेर-मालदाड रोडवरील पेरुच्या बागेजवळ डांबून ठेवल्याची माहिती मिळाली़ पोलीस पथकाने तत्काळ त्या ठिकाणी छापा
टाकला. पोलीस येत असल्याची चाहूल लागताच आरोपींनी अपहरण केलेल्या मुलाला रस्त्यावर सोडून मोटारसायकलवर पसार झाले. पोलिसांनी तत्काळ आरोपींचा पाठलाग सुरू केला़ अखेर पोलिसांनी संगमनेर कारखाना गेटसमोर आरोपींच्या मोटार सायकलला गाडी आडवी लावली. आरोपींनी दुचाकी सोडून देत वेगवेगळ्या दिशेने धूम ठोकली़ पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पळणा-या आरोपींना पकडले. आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, एक चाकू, एक मोटारसायकल, मोबाईल असा १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांच्या दक्षतेमुळे ‘दक्ष’ ची सुटका
संगमनेर येथील विरेश गिरी याने दक्ष कटारिया याच्या अपहरणाचा कट आखला. यासाठी त्याने शहरातीलच एक आणि नाशिकमधील दोघांची साथ घेतली. आरोपींनी सकाळी ७़ १५ वाजता दक्ष याचे अपहरण केल्याची घटना तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली होती. या फुटेजचा आधार घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपींना गजाआड केले.

यांनी केली कारवाई यशस्वी
जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपाधीक्षक रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार, निरीक्षक अभय परमार, सहायक निरीक्षक संदीप पाटील, पाटील, कवडे, गायकवाड, पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के, शंकर चौधरी, रवींद्र कर्डिले, सचिन अडबल, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे, देविदास काळे, मल्लीकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, भागिनाथ पंचमुखी, संदीप दरंदले, योगेश सातपुते, सुनील चव्हाण, दत्ता हिंगडे, बबन बेरड, अमित महाजन आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: 10 million for kidnapping: 4 hours in jail, 4 young detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.