‘त्या’१४ परदेशींसह २३ जण निगेटिव्ह; नगरचे आणखी ४९ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 09:16 AM2020-03-31T09:16:13+5:302020-03-31T09:16:49+5:30

परदेशातून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी उर्वरित ९ परदेशी व इतर असे २३ अहवाल प्राप्त झाले. सुदैर्वाने ते निगेटिव्ह असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

1 negative with 'those' foreigners; The city occupied another 90 people | ‘त्या’१४ परदेशींसह २३ जण निगेटिव्ह; नगरचे आणखी ४९ जण ताब्यात

‘त्या’१४ परदेशींसह २३ जण निगेटिव्ह; नगरचे आणखी ४९ जण ताब्यात

Next

अहमदनगर : परदेशातून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी उर्वरित ९ परदेशी व इतर असे २३ अहवाल प्राप्त झाले. सुदैर्वाने ते निगेटिव्ह असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. दरम्यान या दोघा कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात जामखेड, संगमनेर, राहुरी, नगर, नेवासा येथील ४९ व्यक्ती आल्या असून त्यांना ताब्यात घेतले आहे. यात नेवासे येथील काही परदेशी व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी मॉरिशसमधून १४ परदेशी लोकांचा एक जमाव दिल्ली व तेथून १४ मार्च रोजी नगरला आला होता. त्यांचे नमुने जिल्हा रूग्णालयाने एनआयव्हीकडे पाठवले होते. त्यातील पाचजणांचे अहवाल रविवारी (दि. २९) प्राप्त झाले. त्यापैकी दोघा परदेशी व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले, तर तिघांचा अहवाल निगेटिव्ह आला. उर्वरित ९ जणांचा अहवाल सोमवारी सायंकाळी प्राप्त झाला, तोही निगेटिव्ह असल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला. याशिवाय इतर १४ जणांचा अहवालही सोमवारी निगेटिव्ह आला आहे.
प्रशासनाने आता या परदेशी पाहुण्यांच्या संपकार्तील जिल्ह्यातील विविध भागातील माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. नेवासे, संगमनेर, राहुरी, जामखेड आदी ठिकाणाहून ४९ जणांना ताब्यात घेऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे घशातील स्त्राव नमुने चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात येणार आहेत. नेवासे येथून ११ व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. यात काही परदेशातून आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. या सर्व ४९ जणांचे स्त्राव नमुने आता चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात येणार आहेत.
५२ अहवालाची प्रतीक्षा
दरम्यान, आतापर्यंत एकूण ३२५ जणांचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील २६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यापैकी एकाचा १५ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले. अजून ५२ स्त्राव चाचणीचा अहवाल येणे बाकी असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.  

Web Title: 1 negative with 'those' foreigners; The city occupied another 90 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.