दुचाकी-कार अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार
By Admin | Updated: October 7, 2016 00:50 IST2016-10-07T00:29:39+5:302016-10-07T00:50:02+5:30
लोणी : नगर-मनमाड महामार्गावर दुचाकी व कारमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली़ हा अपघात बाभळेश्वर येथे घडला़

दुचाकी-कार अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार
लोणी : नगर-मनमाड महामार्गावर दुचाकी व कारमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली़ हा अपघात बाभळेश्वर येथे घडला़
मयत बाबासाहेब देवराम मापारी (वय ५८, रा़ लोणी खुर्द), हे आपल्या एम. एच १७ बी. ई ७५०३ या दुचाकीवरून राहात्याहून लोणीकडे येत होते़ तेव्हा त्यांच्या दुचाकीला राजेंद्र छबूराव आव्हाड (रा़ निमगाव कोऱ्हाळे) यांच्या कारने (एम. एच. १७ ऐ. झेड. २१७४) धडक दिली़ या धडकेत बाबासाहेब मापारी जखमी झाले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत सुधाकर मापारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल साहेबराव चव्हाण करीत आहेत.