कोपरगाव : शहरातील डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयाने नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात १०० टक्के निकाल लागला असून अनुष्का पंडोरे हिने ९९.८० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात द्वितीय येण्याचा मान मिळवला आहे. विद्यालयाच्या प्राचार्या मंजूषा सुरवसे यांनी पंडोरे हिचा सत्कार केला.
विद्यालयामध्ये द्वितीय क्रमांक साक्षी केकाण (९८. ४० टक्के), तृतीय क्रमांक अमृता टपाल (९५. २० टक्के) या विद्यार्थिनींनी प्राप्त केला. विद्यालयातील ३५६ विद्यार्थिनी परीक्षेस प्रविष्ट झाल्या होत्या. गुणवत्तेनुसार १२१ विद्यार्थिनींना विशेष प्रावीण्य, १२६ विद्यार्थिनींना प्रथम श्रेणी, १०० विद्यार्थिनींना द्वितीय श्रेणी व ९ विद्यार्थिनींना उत्तीर्ण श्रेणीमध्ये यश प्राप्त झाले. विद्यार्थ्यांचे प्राचार्या मंजूषा सुरवसे, उपमुख्याध्यापक अशोक पठारे, पर्यवेक्षक अरुण गोऱ्हे आदींनी कौतुक केले.