शिवाजीनगरला लसीकरण केंद्र सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:22 IST2021-05-26T04:22:25+5:302021-05-26T04:22:25+5:30

या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले. यावेळी सागर सातपुते, भूषण गुंड, गणेश सातपुते, बापू ...

Start a vaccination center at Shivajinagar | शिवाजीनगरला लसीकरण केंद्र सुरु करा

शिवाजीनगरला लसीकरण केंद्र सुरु करा

या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आले. यावेळी सागर सातपुते, भूषण गुंड, गणेश सातपुते, बापू सातपुते, अविनाश औटी, विनायक जगदाळे, शुभम गायके, सोनू फाळके, मयूर कुलकर्णी, राष्ट्रवादी विद्यार्थीचे उपाध्यक्ष विशाल सकट, गणेश सातपुते मित्र मंडळ व विश्‍वेश्‍वर प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

शिवाजीनगर, वैष्णवी नगर, मराठा नगर, एकनाथ नगर, रभाजी नगर या भागातील नागरिकांना केडगाव व शहरातील लसीकरण केंद्रावर जावे लागत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक व महिलांना लांब जाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. सध्याची परिस्थिती भयानक व बिकट आहे. आरोग्य केंद्रावर मोठी गर्दी असल्याने गर्दीत ज्येष्ठ नागरिक व महिलांची गैरसोय होत आहे. शिवाजीनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोरोना लसीकरण केंद्र सुरु केल्यास येथील नागरिकांची सोय होऊन इतर केंद्रावर होणारी गर्दी देखील कमी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Start a vaccination center at Shivajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.