शिर्डी - ऐश्वर्य आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीपूजनानिमित्त मंगळवारी रात्री साईनगरी दिवाळीच्या प्रकाशाने आणि भक्तीच्या रंगाने न्हाऊन निघाली. या अभूतपूर्व सोहळ्यात साईबाबांच्या तेजोमय मूर्तीवर तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचे रत्नजडित सुवर्णालंकार चढविण्यात आले होते.
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी साई मंदिरात लक्ष्मी पूजन झाले. हिरेजडित मुकुट, लाल मखमली शाल आणि पिवळ्या वस्त्रांमध्ये बाबांचे लोभस रूप अधिकच तेजस्वी दिसत होते. मंदिराचा गाभारा, कळस आणि परिसर लाखो दिव्यांच्या रोषणाईने आणि रंगीबेरंगी फुलांच्या मनमोहक सजावटीने उजळून निघाला होता. सायंकाळी ५ वाजता मुख्य पूजनाला सुरुवात झाली, तेव्हा काही काळासाठी दर्शनरांग थांबवून सारा आसमंत केवळ भक्तिरसात न्हाऊन निघाला.
प्रवेशद्वारावरील आकर्षक रांगोळ्यांनी भक्तांचे स्वागत केले. फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला. दिवाळीचा पारंपरिक फराळाचा नैवेद्य बाबांना अर्पण करण्यात आला. लक्ष्मीपूजनानंतर द्वारकामाई आणि लेंडीबागेचा परिसर भक्तांनी लावलेल्या पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. या मंगलमय सोहळ्याला उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्यासह संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि असंख्य साईभक्त उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजता झालेल्या धूपारतीने या भक्तिमय सोहळ्यात आणखीच चैतन्य भरले.साईबाबांचे ऐश्वर्यसुवर्ण -५०० किलोपेक्षा अधिकचांदी - ७००० किलोपेक्षा अधिकबँक ठेवी- ३३०० कोटी रुपयेदिवाळीनिमित्त श्री साईबाबांच्या तेजोमय मूर्तीवर तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचे रत्नजडित सुवर्णालंकार चढविण्यात आले. मंगळवारी सायंकाळी साई मंदिरात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते लक्ष्मी पूजन झाले. यावेळी संस्थानचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Web Summary : Shirdi celebrated Lakshmi Puja with Sai Baba adorned in ₹2.5 crore worth of gold ornaments. The temple was illuminated with lights and flowers, creating a vibrant, devotional atmosphere. Officials and devotees participated in the festivities.
Web Summary : शिरडी में लक्ष्मी पूजा मनाई गई, जिसमें साईं बाबा को 2.5 करोड़ रुपये के स्वर्ण आभूषणों से सजाया गया। मंदिर रोशनी और फूलों से जगमगा उठा, जिससे भक्तिमय वातावरण बन गया। अधिकारी और भक्त उत्सव में शामिल हुए।