घरापासून महिलांच्या सन्मानाची सुरुवात व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:23 IST2021-03-09T04:23:31+5:302021-03-09T04:23:31+5:30

जिल्हा निवडणूक शाखा आणि महिला व बाल कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. ...

Respect for women should start from home | घरापासून महिलांच्या सन्मानाची सुरुवात व्हावी

घरापासून महिलांच्या सन्मानाची सुरुवात व्हावी

जिल्हा निवडणूक शाखा आणि महिला व बाल कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. येथील निरीक्षण बालगृह येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी निर्मळ बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील होते.

निर्मळ म्हणाल्या, भारतात १९४३ पासून महिला दिनाचे आयोजन करण्यात येते. आपण शिकलो. मात्र, अंधश्रद्धेच्या चक्रात अडकल्याने आजही आपण आपल्या अधिकाराबद्दल जागरूक नाहीत. शिक्षणाचा उपयोग करीत घरापासूनच महिला सन्मानाच्या संस्काराची उजळणी व्हायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुधीर पाटील, परिविक्षा अधिकारी संध्या राशिनकर, तहसीलदार चंद्रशेखर शितोळे, मुला-मुलींचे बालगृह या संस्थेच्या मानद सचिव डॉ. शकील फातेमा शेख, ॲड. प्रज्ञा हेंद्रे, अनिता कर्पे, बागेश्री जरंडीकर, मेघना टेपाळे, अर्जुन नेहरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख,अमोल वाघमोडे, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, अंबिका नक्का, माधव गायकवाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमात मतदार यादीच्या कामी उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, खेळाडू, तन्वी शेंडकर आणि उत्कृष्ट वार्तांकनाबद्दल पत्रकार महेश देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला. निवडणूक शाखेच्यावतीने यावेळी मतदार यादीच्या कामी उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महिला बीएलओ संगीता निमसे, भारती तांबे, स्नेहल लवांडे, प्रीती देशपांडे, नीता माने तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी मंगल झावरे, संगीता घनवट, सरोज ओव्हळ, अलका हासे, डॉ. ऋचा शिंदे यांचा तसेच ४० अंगणवाडी सेविकांचा सन्मानपत्र देत गौरव करण्यात आला.

फोटो ०८ महिला दिन

ओळी- जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा निवडणूक शाखा आणि महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.

Web Title: Respect for women should start from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.