जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:22 IST2021-05-26T04:22:23+5:302021-05-26T04:22:23+5:30

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये अनेक दिवसांपासून जुगार अड्डा सुरू होता. याची खबर मिळताच अहमदनगर येथील स्थानिक ...

Print a gambling den | जुगार अड्ड्यावर छापा

जुगार अड्ड्यावर छापा

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये अनेक दिवसांपासून जुगार अड्डा सुरू होता. याची खबर मिळताच अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने २४ मे रोजी साडेचार वाजेदरम्यान अचानक छापा टाकला. या वेळी त्यांच्याकडून ४,९९० रुपये रोख रक्कम व तिरट नावाचे जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल मिळून आला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकातील हवालदार रोहित येमुल यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत आरोपी अंकुश गंगाधर मकासरे (वय ३२), राहुल विठ्ठल धनवटे (वय ३०), विकास नारायण कुसमुडे (वय २५), राजेंद्र पांडुरंग व्यवहारे (वय ४७), अमोल प्रभाकर कुसमुडे (वय ३८) या पाच जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Print a gambling den

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.