रविवार सायंकाळी मंत्री थोरात यांनी कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार डाॅ. सुधीर तांबे, आमदार डाॅ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोक भांगरे, मधुकर नवले, मीनानाथ पांडे, उपविभागीय अधिकारी डाॅ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने उपस्थित होते.
रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा देशभर आहे. अकोलेचे दोन-अडीचशे कोरोना पेशंट संगमनेरमध्ये उपचार घेत आहेत. रेमडेसिविर गरज ओळखून इंजेक्शन वाटप होते. अकोलेत कोरोना रुग्ण वाढतात ही चिंतेची बाब आहे. अकोलेत ऑक्सिजन बेड वाढले पाहिजेत. त्यासाठी आपण पुढाकार घेऊ. कोविड लस व ऑक्सिजन कमी पडणार नाही याची काळजी घेतली जाईल, असा विश्वास मंत्री थोरात यांनी दिला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, अमित भांगरे, रवी मालुंजकर, रमेश जगताप, बाळासाहेब नाईकवाडी, आरिफ तांबोळी, डाॅ. रवी गोर्डेे, डाॅ. जयसिंग कानवडे, तहसीलदार मुकेश कांबळे, नगरपंचायतचेे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. इंद्रजित गंभिरे, डाॅ. बाळासाहेब मेेहेत्रे, डाॅ. श्याम शेटे, पोलीस निरीक्षक अभय परमार उपस्थित होते.
...............
राष्ट्रवादी युवककडून आरोप, युवक काँग्रेसकडून औषधे वाटप
रेमडेसिविर इंजेक्शन वाटपात प्रशासनाकडून दुजाभाव केला जातो, असा आरोप युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी मालुंजकर यांनी सभागृहात केला. यावरून बैठकीत काही काळ गोंधळ उडाला होता. तालुका युवक काँग्रेसच्या वतीने कोरोनासंबंधित औषधांचे किट कोविड रुग्णांना वाटप करण्यासाठी नोडल अधिकारी डाॅ. श्याम शेटे यांच्याकडे मंत्री थोरात यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.