....
गुलमोहर रोड परिसरात लसीकरण केंद्राची मागणी
अहमदनगर : प्रभाग क्रमांक-४ मधील नागरिकांची लसीकरणासाठी गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिकेने या भागातील गुलमोहर रोड व तारकपूर येथील सिंधी हॉल येथे लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. यावेळी सावन छाबरा, जयकुमार रंगलानी, मोहित पंजाबी, रविंदरसिंग नारंग, शेरी ओबेरॉय, सनी अहुजा, पुनीत दुग्गल, बब्बू नवलानी आदी उपस्थित होते.
.......
कल्याण रोड परिसरात लसीकरण केंद्र सुरू
अहमदनगर: कल्याण रोड परिसरात स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी नगरसेवक सचिन शिंदे यांनी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाने कल्याण रोड परिसरात लसीकरण केंद्र सुरू केले. केंद्राचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. यावेळी दिनकर अघाव, जय डिडवानिया, सतीश गिते, मनोज शिंदे, संजय साकुरे, रवींद्र बागडे, शेखर उंडे, अविनाश पांढरे, प्रशांत काकडे आदी उपस्थित होते.
....
भिस्तबाग चौकात चाचणी
अहमदनगर: महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळतात. अशा भागातील नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. मंगळवारी भिस्तबाग चौकात नागरिकांची चाचणी करण्यात आली.
....
निविदांची छाननी
अहमदनगर: महापालिकेच्या शहर व परिसरातील विकास कामांसाठी ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्या होत्या. प्राप्त निविदांची मंगळवारी छाननी करण्यात आली आहे. छाननीत पात्र झालेल्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे.
....
अडीच हजार चाचण्या
अहमदनगर: कोरोना रुग्णांची शहरातील संख्या कमी झाली असली तरी महापालिकेने चाचण्यांची संख्या वाढविली आहे. मंगळवारी दिवसभरात मनपाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी २ हजार ५०० नागरिकांच्या चाचण्या केल्या. चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
..........
बाजार समितीचे दोन्ही दरवाजे बंद
अहमदनगर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा एक दरवाजा पूर्वीपासूनच बंद आहे. त्यात आता दुसरा दरवाजाही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली असून, नागरिकांना कोठी मार्गे प्रवास करावा लागत आहे.
.......