तमाशा कलावंतांना अर्थिक मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:21 IST2021-04-07T04:21:44+5:302021-04-07T04:21:44+5:30
....................................... नऊ वर्षांपासून शोधतोय वडिलांना तिसगाव : शिराळ (ता.पाथर्डी) येथील बबनराव लक्ष्मण औटी हे मनोरुग्ण वृद्ध २०१२ पासून ...

तमाशा कलावंतांना अर्थिक मदत द्या
.......................................
नऊ वर्षांपासून शोधतोय वडिलांना
तिसगाव : शिराळ (ता.पाथर्डी) येथील बबनराव लक्ष्मण औटी हे मनोरुग्ण वृद्ध २०१२ पासून घरापासून अचानक दुरावले गेले. तेव्हापासून सलग नऊ वर्षे सरली. कुटुंब सैरभैर झाले. मात्र तरीही औटी यांचा सलुन व्यावसायिक मुलगा नवनाथ अजूनही गावोगावी वडिलांना शोधतोय. माझे वडील आहेत. पेहराव, अंगकाठीचे वर्णन सांगत शनिवार, रविवार शोधमोहीम करायची. नवनाथ औटी या सलुन व्यावसायिक असलेल्या मुलाला मात्र अजूनही वडील भेटतीलच, ही आस कायम आहे. तसा माझा दृढनिश्चय आहे व वडील मला एक दिवस तरी भेटतीलच, असे निराश न होता सांगत नवनाथ पुढील गावी रवाना होत असल्याचे चित्र आहे
.................
रोजगार उपलब्ध करून द्यावा!
पाथर्डी : मराठा समाजातील तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी शासनाने आण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला पाचशे कोटी निधी द्यावा, तसेच मराठा समाजातील वाढती बेरोजगारी शेतकरी आत्महत्या मराठा आरक्षण या सर्व प्रश्नांना आतापर्यत शासनाने ऐरणीवर ठेवले आहे. आण्णासाहेब पाटील विकास महामंडळातून तरुणांना अपेक्षा आहेत. त्या पूर्ण होण्यासाठी महाविकास आघाडीने पाचशे कोटी निधी महामंडळास द्यावा, असे मत पाथर्डी तालुक्यातील हत्राळ येथील स्वाभिमानी महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले यांनी व्यक्त केले. स्वाभिमानी महासंघाची आढावा सहविचार सभा पार पडली.
.........................