भाजी बाजारातून मोबाइल चोरला
अहमदनगर: नवनागापूर येथील सह्याद्री चौकातील भाजी बाजारातून चोरट्याने एकाचा मोबाइल चोरून नेला. ६ मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अंबरनाथ विठोबा आनंदकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक नेटके हे पुढील तपास करत आहेत.
वाहनचालकाने चोरले पैसे
अहमदनगर: वाहनावरील चालकाने मालकाचे २५ हजार रुपये चोरून पसार झाला. कर्जत शहरातील सिद्धार्थनगर येथे ५ मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात विशाल अंकुश भैलुमे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक साहेबराव शिदें (रा. भांडेवाडी ता. कर्जत) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार गाडे हे पुढील तपास करत आहेत.
अपघातात एक जखमी
अहमदनगर:नगर तालुक्यातील खांडके शिवारात स्कॉर्पिओच्या धडकेत एक जण जखमी झाला. ७ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. संदीप दगडू चव्हाण असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष एकनाथ चेमटे (रा. रांजणी, ता. नगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक आबनावे हे पुढील तपास करत आहेत.
घरातून दागिने चोरले
अहमदनगर: अकोले तालुक्यातील कुंभेफळ येथे चोरट्याने घरातून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ६ मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात मुरलीधर गोडाजी पांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेखर प्रकाश कोटकर (रा.कुंभेफळ, ता. अकोले) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक कोरडे हे पुढील तपास करत आहेत.
मोटारसायकल चोरली
अहमदनगर: नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथून चोरट्याने मोटारसायकल चोरून नेली. ६ मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी अमोल देवीदास देशमुख यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक राठोड हे पुढील तपास करत आहेत.