अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
By सुदाम देशमुख | Updated: June 9, 2025 11:15 IST2025-06-09T11:14:05+5:302025-06-09T11:15:03+5:30
जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीतील १३ मुले एमपीएल (MPL) क्रिकेट पाहण्यासाठी गहुंजे (पुणे) येथे गेले होते.

अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
नेवासा (जि. अहिल्यानगर) : तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात झालेल्या क्रुझर गाडी पाठीमागून ट्रकवर आदळली. या अपघतात क्रुझर गाडीमधील २ ठार तर इतर ११ जण जखमी झाले आहेत. अपघातातील प्रथमेश तेली याचा जागेवरच मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेला वृषभ सोनवणे याचा उपचारादरम्यान नगर येथील रुग्णालयात मृत्यू झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीतील १३ मुले एमपीएल (MPL) क्रिकेट पाहण्यासाठी गहुंजे (पुणे) येथे गेले होते.
ट्रकवर जाऊन धडकली गाडी
बोदवडकडे माघारी परतत असताना अहिल्यानगर ते संभाजीनगर महामार्गावर नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला गावाच्या हद्दीत सोमवारी पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास क्रुझर गाडीने ट्रकवर पाठीमागील बाजुस धडक दिल्याने क्रुझर गाडीमधील इतर ११ मुले जखमी झाली.
त्यांच्यावर नेवासा फाटा येथे उपचार चालू आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक धनंजय जाधव व पोलिस कर्मचारी तत्काळ हजर झाले व जखमींना नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचारसाठी हलविण्यात आले आहे.
या अपघातात अकादमीचे एक शिक्षकही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा एक पाय निकामी झाल्याचे सांगितले जात आहे.