हरणाच्या पाडसाला मिळाले जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:49+5:302021-07-20T04:15:49+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात हरणाच्या पाडसाला जीवदान देण्याचे कार्य काळे कुटुंबाच्यावतीने करण्यात आले आहे. बकरीचे नियमित दूध ...

हरणाच्या पाडसाला मिळाले जीवदान
केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात हरणाच्या पाडसाला जीवदान देण्याचे कार्य काळे कुटुंबाच्यावतीने करण्यात आले आहे. बकरीचे नियमित दूध मिळत असल्याने आता तीच पाडसाची आई बनली आहे.
चापेवाडी येथील धूरकुंड परिसरात पाडस कुत्र्यांच्या तावडीत सापडले होते. कुत्र्यांकडून शिकार होणार त्याचवेळी दादासाहेब काळे व त्यांच्या कुटुंबीयांनी पाडसाला वाचवित घरी आणून त्याला दूध पाजून जीवदान दिले. मागील वर्षी दादा काळे यांच्या पाळीव कुत्र्याची शिकार बिबट्याकडून करण्यात आली होती. या परिसरात वन्यप्राण्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आढळून येते. जेऊर परिसरात गर्भगिरीच्या चोहोबाजूंनी डोंगररांगा आहेत. पोषक वातावरणामुळे हरिण, काळवीट, लांडगा, तरस, कोल्हा, रानमांजर, खोकड, साळींदर या वन्यप्राण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच या परिसरात बिबट्यांचे वास्तव्य आढळून आलेले आहे.
कुत्र्यांच्या तावडीत सापडलेले पाडस दादा काळे यांच्या शेळीचे दूध पित आहे. शेळीच हरणाची माता झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
----
जंगलात होणार मुक्तता..
पाडसावर औषधोपचार करून त्याला जंगलात सुरक्षितस्थळी मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती वनपाल मनेष जाधव व वनरक्षक श्रीराम जगताप यांनी दिली.
180721\5435img-20210718-wa0454.jpg
पाडसाला मिळाले जीवदान