बुडालेल्या मुलीचा अखेर मृत्यू

By Admin | Updated: September 20, 2014 23:22 IST2014-09-20T23:12:36+5:302014-09-20T23:22:07+5:30

राहाता : राहाता नगरपरिषदेच्या तलावात धुणे धुण्यासाठी गेली असता, पाय घसरून पडलेल्या पूजा राठोड या मुलीचा शिर्डी येथे उपचारादरम्यान मुत्यू झाला.

The death of the old girl dies after all | बुडालेल्या मुलीचा अखेर मृत्यू

बुडालेल्या मुलीचा अखेर मृत्यू

राहाता : राहाता नगरपरिषदेच्या तलावात धुणे धुण्यासाठी गेली असता, पाय घसरून पडलेल्या पूजा राठोड या मुलीचा शिर्डी येथे उपचारादरम्यान मुत्यू झाला.
गुरुवारी (दि. १८) पूजा राजू राठोड (वय १२) व राणी राठोड या दोन मुली कातनाल्यावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी पूजा पाय घसरून पाण्यात पडली. तेव्हा राणीने तिला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. परंतु तिही बुडाली. हे पाहून राणीच्या आईने तिकडे धाव घेतली. परंतु पोहता येत नसल्याने तिघीही बुडू लागल्या.
प्रसंगावधान राखून तेथील तरूणांनी तिघींना बाहेर काढले. परंतु बराच वेळ पाण्यात राहिल्याने पूजा अत्यवस्थ झाली होती. तिला त्वरित शिर्डीच्या साईबाबा रूग्णालयात हलविण्यात आले. परंतु दोन दिवसांच्या डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही पूजाला वाचविण्यात यश आले नाही. तिच्या मुत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशिरा राहाता येथे पूजावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)

Web Title: The death of the old girl dies after all

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.