मनपा बालरोगतज्ज्ञांची समिती स्थापन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:22 IST2021-05-26T04:22:38+5:302021-05-26T04:22:38+5:30

अहमदनगर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी शहरातील बालरोगतज्ज्ञांची लवकरच समिती स्थापन केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त ...

Corporation will set up a committee of pediatricians | मनपा बालरोगतज्ज्ञांची समिती स्थापन करणार

मनपा बालरोगतज्ज्ञांची समिती स्थापन करणार

अहमदनगर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी शहरातील बालरोगतज्ज्ञांची लवकरच समिती स्थापन केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिली.

महापालिका आयुक्त गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील बालरोगतज्ज्ञांची बैठक झाली. या बैठकीला आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, सदस्य निखिल वारे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक श्याम नळकांडे, बालरोगतज्ज्ञ डॉ. मंगेश कुलकर्णी, पीयूष खंडेलवाल, दीपक अग्रवाल, श्याम तारडे, मकरंद धर्मा, गौरव मचाले, नानासाहेब अकोलकर आदी बालरोगतज्ज्ञ उपस्थित होते. या बैठकीत तिसऱ्या लाटेतील लहान मुलांच्या संभाव्य धोक्याबाबत चर्चा झाली. महापालिकेच्या वतीने उपाययोजना हाती घेण्यात आल्याचे आयुक्त गोरे यांनी सांगितले. लहान मुलांसाठी ऑक्सिजनचे बेड वाढविण्यावरही यावेळी चर्चा झाली. तिसऱ्या लाटेचा सामना करताना बालरोगतज्ज्ञांचे सहकार्य आवश्यक आहे. बालरोगतज्ज्ञांनी पालकांमध्ये जनजागृती करावे, असे आवाहनही गोरे यांनी केले.

Web Title: Corporation will set up a committee of pediatricians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.