श्रीगोंद्याच्या राजकारणाला उकळी

By Admin | Updated: July 11, 2014 00:56 IST2014-07-11T00:31:51+5:302014-07-11T00:56:17+5:30

श्रीगोंदा : भाजपाचे तिकीट मिळो अथवा ना मिळो, कार्यकर्त्यांची इच्छा हेच माझे तिकीट आहे.

Boosting Shrigonda's politics | श्रीगोंद्याच्या राजकारणाला उकळी

श्रीगोंद्याच्या राजकारणाला उकळी

श्रीगोंदा : भाजपाचे तिकीट मिळो अथवा ना मिळो, कार्यकर्त्यांची इच्छा हेच माझे तिकीट आहे. कुकडी, घोड, साकळाई, सीना, वीज, रस्ते, रोजगार हे प्रश्न घेऊन विधानसभा निवडणूक आखाड्यात उतरणार आहे, अशी घोषणा कुकडी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी केली.
कुकडी साखर कारखाना कार्यस्थळावर सभापती मीना देवीकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जगताप समर्थकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जगताप बोलत होते.
मान्यवरांची भाषणे
यावेळी अशोक कार्ले, सिद्धेश्वर देशमुख, मीना देवीकर, संजय जामदार, अ‍ॅड.सुभाष डांगे, शामराव नागवडे, गौतम घोडके, विलासराव दिवटे, दत्ता शिर्के, सुभाष गायकवाड, दादा औटी, भैय्या वाबळे, हनुमंत झिटे, सुभाष कांबळे, सुभाष काळोखे, रभाजी कातोरे, अ‍ॅड.निवृत्ती वाखारे यांचीही भाषणे झाली. सुखेदव तिखोले यांनी प्रास्ताविक केले.
बैठकीत कार्यकर्त्यांनी राहुल जगताप यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
(तालुका प्रतिनिधी)
राहुल समाजासाठी दिला
मागील विधानसभा निवडणुकीत ‘आता तुम्ही आमचे काम करा, पुढच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही तुमचे काम करू’ असा शब्द नागवडे यांनी दिला होता. आता त्यांनी शब्द पाळावा. मला आमदारकीच्या निवडणुकीने तीन वेळा हुलकावणी दिली. माझे आमदारकीचे स्वप्न अपुरे आहे. आता राहुल समाजासाठी दिला आहे. तो समाजाबरोबर आणि समाजाने त्याच्याबरोबर राहावे. मी फक्त आशीर्वाद देण्याची भूमिका करणार आहे, असे भावनिक उद्गार कुकडी साखर कारखान्याने संस्थापक कुंडलिक जगताप यांनी काढले.
धनगर समाजाची बैठक
मेळाव्यानंतर राहुल जगताप यांच्या उमेदवारीला समर्थन देण्यासाठी धनगर समाजाची बैठक झाली. बैठकीस नाना पडवळकर, शेंडगे, आप्पा धायगुडे, सुखदेव तिखोले आदी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींच्या
मनगटात दम नाही
लोकसभा निवडणुकीत ज्यांना मदत केली ते तिकीट देण्याचा शब्द पाळतील, असा विश्वास आहे. आता तिकिटासाठी वेळ घालविणार नाही. १२ जुलैपासून मतदार संघाचा दौरा करणार असून यावेळी जनतेचे प्रश्न समजावून घेणार आहे. कुकडीचे पाणी पुणेकरांनी पळविले की, लोकप्रतिनिधींच्या मनगटात दम नाही म्हणून पाणी मिळत नाही, हा प्रश्न आहे. तालुक्यात सध्या वीजप्रश्न गंभीर झाला आहे. लोकप्रतिनिधींच्या भावाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. मग त्यांनी आमदारकी, मंत्रीपदाची सत्ता कुणासाठी वापरली ? असा सवाल राहुल जगताप यांनी केला.

Web Title: Boosting Shrigonda's politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.