अहिल्यानगर : गेल्या आठवडाभरापासून गायब झालेल्या थंडीने २९ नोव्हेंबरला रात्री जोरदार पुनरागमन केले आहे. त्यानंतर सलग दोन दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे.
सोमवारी तापमानाचा पारा थेट ९.४ अंशांपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे चांगलीच हुडहुडी भरली आहे. सोमवारी नोंदले गेलेले तापमान राज्यातील नीचांकी तापमान होते.
गत आठवड्यात तापमान वाढल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात उकाडादेखील वाढला होता. पण आता पुन्हा थंडीचा कडाका सुरू झाला आहे.
१२ ते १४ अंशांवर असलेले तापमान अचानकपणे ९ अंशांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे थंडीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
थंडीमुळे रात्री उशिरापर्यंत चालणारी वर्दळही कमी झाली आहे. सकाळी फिरायला येणाऱ्यांच्या संख्येतही घट झाल्याचे दिसून आले. सायंकाळनंतर बाजारातही शुकशुकाट दिसला.
अधिक वाचा: Bajari Market : थंडी वाढताच 'बाजरी'च्या मार्केटमध्ये भरभराट; वाचा राज्यात कसा मिळतोय दर?
