हिवाळ्यात सर्दी-खोकल्यापासून दूर राहायचे असेल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर चौरस आहार गरजेचा आहे. सध्या बाजारात दाखल झालेल्या भाज्या फायबर, व्हिटॅमिन सी आणि आयर्नने परिपूर्ण आहेत.
थंडीमुळे त्वचा कोरडी पडते, मात्र या भाज्या शरीरातील ओलावा टिकवतात. विशेषतः थंडीत बाजरीची भाकरी, लोणी आणि वांग्याचे भरीत हा बेत आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी ठरत आहे.
थंडीत मेथीची भाजी खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. हिवाळ्यात शरीराचे तापमान टिकवून ठेवणे, प्रतिकारशक्ती वाढवणे आणि पाचन चांगले ठेवणे या दृष्टीने मेथी उत्तम आहे. खाली प्रमुख फायदे दिले आहेत:
थंडीत मेथीची भाजी खाण्याचे फायदे१) मेथीच्या पानांमध्ये नैसर्गिक उष्ण गुणधर्म असतात. त्यामुळे थंडीत शरीराला आतून उब मिळते.२) तिच्यातील व्हिटॅमिन सी, ए आणि अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवून सर्दी, खोकला, ताप यांपासून संरक्षण करतात.३) मेथीची पानं फायबरने भरलेली असल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते. पाचक रस वाढतात व अन्नाचे पचन सुरळीत होते.४) मेथी इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठीही उपयुक्त.५) मेथीमध्ये असलेले प्रतिजैविक घटक सांधे दुखी, स्नायू वेदना कमी करतात. जे हिवाळ्यात जास्त जाणवतात.६) थंडीत त्वचा कोरडी पडते; मेथीतील नैसर्गिक तेलं व पोषक तत्वे त्वचेला नैसर्गिक ओलावा देतात आणि केसगळती कमी करतात.७) रक्तातील चांगले कोलेस्टेरॉल वाढवते व फायबर आणि अँटिऑक्सिडंट्समुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.
कोणत्या भाजीचा काय फायदा?◼️ मेथी फायबरने भरपूर, वजन नियंत्रित करते◼️ गाजर व्हिटॅमिन ए ने युक्त असल्याने डोळे ताजेतवाने ठेवते.◼️ पालक आयर्नने रक्त वाढवते, तर मटार प्रोटिन देते.◼️ गवार पोटॅशियमने हृदय निरोगी ठेवते, बीट रक्ताभिसरण सुधारते.
काय म्हणतात तज्ज्ञ?◼️ या दिवसात मिळणाऱ्या फळभाज्या आणि मेथी-पालक पालेभाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर असतात.◼️ विशेषतः रताळे, बीट, गाजर या कंदमुळांचा आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश दुपारच्या जेवणात केल्यास त्वचा कोरडी पडत नाही आणि व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो.
अधिक वाचा: थंडीमध्ये शरीराला किती पाण्याची आवश्यकता? दररोज किती पाणी प्यावे? जाणून घ्या सविस्तर
Web Summary : Boost winter immunity with nutritious leafy vegetables like fenugreek. Rich in vitamins, fiber, and antioxidants, they combat dryness, aid digestion, and protect against infections. Carrots benefit eyes, spinach boosts iron, and beets improve circulation, as per experts.
Web Summary : मेथीसारख्या पालेभाज्या खाऊन थंडीत रोगप्रतिकारशक्ती वाढवा. व्हिटॅमिन, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असल्याने, त्या कोरडेपणाशी लढतात, पचनास मदत करतात आणि संक्रमणांपासून संरक्षण करतात. गाजर डोळ्यांसाठी, पालक लोहासाठी आणि बीट रक्ताभिसरण सुधारते, तज्ञांच्या मते.