Lokmat Agro >बाजारहाट > Tur Market Update: तुरीच्या दरात स्थिरता; कसे मिळाले दर ते वाचा सविस्तर

Tur Market Update: तुरीच्या दरात स्थिरता; कसे मिळाले दर ते वाचा सविस्तर

Tur Market Update: Stability in Tur price; Read in detail how the price was achieved | Tur Market Update: तुरीच्या दरात स्थिरता; कसे मिळाले दर ते वाचा सविस्तर

Tur Market Update: तुरीच्या दरात स्थिरता; कसे मिळाले दर ते वाचा सविस्तर

Tur Market Update : बाजार समितीत आठवडाभरात तुरीला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Tur Market Update : बाजार समितीत आठवडाभरात तुरीला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

खामगाव : मागील आठवड्यात खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला ७२०० ते ७४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. शेतकरी आता दरवाढीची प्रतीक्षा करत आहेत.

मागील काही दिवसांपासून तूर काढणीचा हंगाम सुरू आहे. यंदा तुरीला लागवडीचा खर्च जास्त आला असून, बाजार समितीत अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमालाच्या विक्रीतून अपेक्षित फायदा मिळत नाही. तुरीच्या दरात काही महिन्यांपासून चढ-उतार दिसत असली तरी, सध्या त्यात स्थिरता आली आहे. तथापि, शेतकऱ्यांची अस्वस्थता कमी होत नाही.

चिंतेची मुख्य कारणे !

तुरीचे उत्पादन कमी होणे, बाजारातील मागणीचे असंतुलन आणि त्यावर आधारित दरवाढ ही मुख्य कारणे आहेत. त्याचबरोबर, शेतकऱ्यांना मिळत असलेल्या दरांमध्ये लागवड खर्च काढणे कठीण आहे. त्यामुळे त्यांना खर्च भागविणे कठीण होणार आहे.

कमी उत्पादनामुळे शेतकऱ्यांना होतोय फटका!

हवामान बदल व रोगराईमुळे तुरीचे उत्पादन घटले आहे. यामुळे बाजारातील तुरीची मागणी व पुरवठ्यामध्ये असंतुलन निर्माण झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादनाच्या तुलनेत कमी दर मिळत असल्याने त्यांची चिंता वाढली आहे.

सरकारकडून मदतीची अपेक्षा

शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी सरकारकडून अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना दरवाढ व उत्पादन खर्चाची भरपाई मिळवण्यासाठी सरकारचे अधिक सक्रिय लक्ष लागणे आवश्यक आहे.

स्थिरता कशामुळे?

दर स्थिर राहण्याचे मुख्य कारण म्हणजे पुरवठा व्यवस्थेतील सुधारणा होय. बाजारात उपलब्ध तुरीच्या साठ्याने या दराला स्थिर ठेवले आहे; मात्र शेतकऱ्यांचे उत्पन्न तोट्यात आहे.

तुरीला असे मिळाले दर (प्रतिक्विंटल)

दिनांक               कमीत कमीजास्तीत जास्त
१ फेब्रुवारी६०००                ७३५०
३ फेब्रुवारी                         ५०५०  ७२५०
४ फेब्रुवारी                          ३४०० ७१५०
५ फेब्रुवारी                             ४०००७२५०
६ फेब्रुवारी                              ६२००७४००

हे ही वाचा सविस्तर : Grapes Market : उन्हाळ्यापूर्वी बाजारात द्राक्षे दाखल; पाहा काय आहेत यंदा भाव वाचा सविस्तर

Web Title: Tur Market Update: Stability in Tur price; Read in detail how the price was achieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.