Join us

मालदांडी ज्वारीला मिळतोय चांगला भाव, या बाजार समितीत क्विंटलमागे ..

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 27, 2024 3:43 PM

राज्यात मागील काही दिवसांपासून मालदांडी जातीच्या ज्वारीला चांगला भाव मिळत असून आज पुणे बाजार समितीत 692 क्विंटल ज्वारीची आवक ...

राज्यात मागील काही दिवसांपासून मालदांडी जातीच्या ज्वारीला चांगला भाव मिळत असून आज पुणे बाजार समितीत 692 क्विंटल ज्वारीची आवक झाली होती. यावेळी शेतकऱ्यांना क्विंटल मागे ४३०० रुपयांचा भाव मिळत आहे.

राज्यभरात आज सकाळच्या सत्रात 6,157 क्विंटल ज्वारीची आवक झाली. यावेळी शाळुसह पांढरी, मालदांडी , लोकल , दादर , रब्बी ज्वारी शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणली होती. शेतकऱ्यांना सर्वसाधारण 2000 ते 4500 रुपयांपर्यंत भाव मिळत असून सर्वाधिक भाव आज पुणे बाजार समितीत शेतकऱ्यांना मिळाला.

आज मुंबई बाजार समितीतही सर्वाधिक ज्वारीची आवक झाली होती यावेळी 3657 क्विंटल लोकल ज्वारी विक्रीसाठी बाजारपेठेत आली.क्विंटल मागे साधारण 4200 ते 5600 रुपयांचा भाव ज्वारीला मिळाला.

जाणून घ्या कोणत्या बाजार समितीत काय मिळतोय भाव

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/03/2024
अहमदनगरमालदांडी9250030002700
अमरावतीलोकल3240028502625
बुलढाणाशाळू50200021002050
छत्रपती संभाजीनगररब्बी14215128702511
धाराशिवमालदांडी22340037753550
धाराशिवपांढरी120260040003500
जळगावहायब्रीड117220022252211
जळगावपांढरी800213022142182
जळगावदादर72233526502500
मंबईलोकल3657250056004200
नाशिकपांढरी10212621262126
परभणीपांढरी16170025002200
पुणेमालदांडी692380048004300
सांगलीहायब्रीड165318034003290
सांगलीशाळू337337538103605
सोलापूरपांढरी73277040053500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6157
टॅग्स :ज्वारीबाजार