Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारात मंदी; भावात चढ-उतार सुरू वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:01 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये आज (२ डिसेंबर २०२५) सोयाबीनच्या आवक (Soybean Arrival) आणि दरांमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून आला.

एकूण आवक २८ हजार ९३० क्विंटल नोंदवली गेली असून काही बाजारांमध्ये आवक (Soybean Arrival) मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट जाणवले. स्थानिक व पिवळ्या जातीच्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी होती, तर पांढऱ्या सोयाबीनचे भाव स्थिर राहिले.

कोणत्या जातीला जास्त मागणी?

पिवळा सोयाबीनला सर्वाधिक मागणी व स्थिर दर

पिवळ्या सोयाबीनला आज राज्यभरात चांगली मागणी दिसून आली. मुखेड, लातूर, जालना, अकोला, यवतमाळ या बाजारात पिवळ्या सोयाबीनचे भाव स्थिर आणि जास्त होते.

मुखेड : ४,४५० – ४,६०० (सर्वाधिक सरासरी दर ४,५००)

जालना : जास्तीत जास्त ५,३०० (आजचा सर्वाधिक भाव)

लोकल जातीला मध्यम मागणी

अमरावती, सोलापूर, नागपूर या बाजारात लोकल जातीची आवक मोठी होती. सोलापूरमध्ये लोकल सोयाबीनला आज उच्च दर ४,६४० मिळाला.

पांढरा सोयाबीनला मागणी कमी

लासलगाव – निफाड येथे पांढऱ्या सोयाबीनचे भाव इतर बाजारांच्या तुलनेत कमी राहिले

राज्यातील सोयाबीन बाजारात आज पिवळ्या जातीला सर्वाधिक मागणी होती.

आवक कमी होण्यामागे चांगल्या भावाची प्रतीक्षा, साठवणूक आणि गुणवत्तेतील फरक ही प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

जालना व मुखेडमध्ये सर्वाधिक दर, तर काही बाजारात ३००० रुपयांपर्यंत घसरण होत असल्याचे सांगितले.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/12/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल21400043994200
चंद्रपूर---क्विंटल117380043754150
राहूरी -वांबोरी---क्विंटल6410041754137
मानोरा---क्विंटल693389544004242
सोलापूरलोकलक्विंटल76400546404450
अमरावतीलोकलक्विंटल6036400044504225
जळगावलोकलक्विंटल207370044003700
नागपूरलोकलक्विंटल873380045704377
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल168320044694400
बारामतीपिवळाक्विंटल105380044364435
लातूरपिवळाक्विंटल7211385046204400
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल85400046004250
जालनापिवळाक्विंटल7355380053004425
अकोलापिवळाक्विंटल4022400044804350
यवतमाळपिवळाक्विंटल992400045704285
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळीपिवळाक्विंटल23300045004179
मुखेडपिवळाक्विंटल59445046004500
बोरी-अरबपिवळाक्विंटल42380044604150
बाभुळगावपिवळाक्विंटल800330147204201
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल39300042003700

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर :Sericulture Farming : सोयगावात रेशीम क्रांती; रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Market Fluctuations: Prices Vary; Read Detailed Analysis Here

Web Summary : Soybean prices fluctuate across Maharashtra markets. Yellow soybean sees high demand. Arrival volume varies, impacting prices. Jalna and Mukhed offer top rates, while some markets face price drops. Farmers await better prices, impacting supply.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती