Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Niryat : भारताच्या कांदा आयातीस बांगलादेशची परवानगी, भाव वाढतील का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 13:02 IST

Kanda Niryat : नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना या निर्णयातून दिलासा मिळेल का?

नाशिक : तब्बल दहा महिन्यांपासून भारतीय कांद्याच्या आयातीस परवानगी नाकारलेल्या बांगलादेशने त्यांच्या देशातील कांद्याचा स्टॉक संपताच भारताच्या कांद्याला आयातीस परवानगी दिली आहे. 

शुक्रवारी (दि. ५) तेथील सरकारने याबाबतचे आदेश पारित केले. त्यामुळे आता भारतातील व विशेषतः नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दररोज १५०० मेट्रिक टन कांदाबांगलादेशला रवाना होईल.

७ डिसेंबरपासून प्रत्येक दिवशी ३० टनांचे ५० (आयपी) म्हणजे कांदा आयात परवाने दिले जाणार आहे. १ ऑगस्ट २०२५ मध्ये बांगलादेशमधील ज्या आयातदारांनी यासाठी अर्ज केले होते, त्यांनाच हे आयपी परमिट मिळणार आहे. बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश असून, या देशाने दहा महिन्यापासून परवानगी नाकारल्याने कांदा चाळीतच साठून राहिला आहे. 

बांगलादेशने भारताच्या कांद्याला परवानगी दिल्याने आपल्याकडील साठवणूक केलेल्या उन्हाळी कांद्याला व नवीन लाल कांद्याला चांगला भाव मिळेल. बाजारातील परिस्थितीनुसार ही नियंत्रित आयात प्रक्रिया पुढील सूचना येईपर्यंत सुरू राहील. असे निर्यातदार संघटनचे विकास सिंग यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladesh Lifts Ban on Indian Onion Imports; Prices Expected to Rise

Web Summary : After a ten-month ban, Bangladesh has permitted Indian onion imports, providing relief to Nashik farmers. Daily exports of 1500 metric tons are expected, potentially increasing prices for stored and new onions. The controlled import process will continue until further notice.
टॅग्स :कांदामार्केट यार्डबांगलादेशशेती क्षेत्रशेती