आज ०७ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची २५ हजार क्विंटल झाली. पुणे, सातारा, छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव झाले. यामध्ये कमीत कमी ५०० रुपयांपासून सरासरी १३०० रुपयांपर्यंत दर मिळाले.
यामध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात २९४० क्विंटल आवक झाली तर कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी १०५० रुपये दर मिळाला. सातारा जिल्ह्यात २१५ क्विंटल आवक झाली. तर कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ११५० रुपये दर मिळाला.
जुन्नर आळेफाटा बाजारात चिंचवड कांद्याला कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी १३५० रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कांद्याची १३ हजार क्विंटलची आवक झाली. कमीत कमी ३०० रुपये तरी सरासरी ०१ हजार रुपये दर मिळाला.
तसेच पुणे पिंपरी बाजारात कमीत कमी १ हजार रुपये तर सरासरी १४०० रुपये आणि पुणे खडकी बाजारात कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी ९५० दर मिळाला.
Web Summary : Onion arrivals in Maharashtra's markets reached 25,000 quintals. Pune saw 13,000 quintals of local onion arrive with prices averaging ₹1,000. Other districts saw average rates between ₹1,050 and ₹1,400.
Web Summary : महाराष्ट्र के बाजारों में प्याज की आवक 25,000 क्विंटल रही। पुणे में स्थानीय प्याज की 13,000 क्विंटल आवक हुई, जिसकी औसत कीमत ₹1,000 रही। अन्य जिलों में औसत दरें ₹1,050 से ₹1,400 के बीच रहीं।