सोलापूर : ऊस दर जाहीर न करणाऱ्या साखर कारखान्यांचा गाळप बंद पाहू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी देताच जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, ऊस दर जाहीर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे.
मंगळवार, ९ डिसेंबरपर्यंत दर जाहीर न करणाऱ्या कारखान्यांना नोटिसा बजावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी दिले. ३४ पैकी १९ कारखान्यांनी दर जाहीर केले आहे.
उर्वरित १५ कारखाने दर जाहीर करावेत, यासाठी उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडून पाठपुरावा सुरू आहे.
ज्या साखर कारखानदारांनी अद्याप ऊस दर जाहीर केलेला नाही, अशा कारखानदारांना तंबी देत संबंधितांवर कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोमवारी दिला.
ऊस दर जाहीर करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातून रोज संबंधित कारखान्यांना रोज फोन जात आहे. संबंधित पाठपुराव्याचा अहवाल साखर आयुक्तांना पाठविल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.
जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर न करताच गाळप हंगाम सुरू केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या.
या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी १४ नोव्हेंबर तसेच १७ नोव्हेंबर रोजी साखर कारखानदारांसोबत बैठक घेतली. बैठकीत सर्व कारखान्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत ऊस दर जाहीर करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
या निर्देशानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील १९ साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला आहे. उर्वरित १५ कारखान्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडूनही तत्काळ दर जाहीर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
दर जाहीर न करणाऱ्या कारखान्यांची गंभीर दखल घेण्यात येईल, असे उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी संबंधित सर्व ऊस कारखानदारांना कळविण्यात आल्याची माहिती दिली. हे कारखानदार दर केव्हा जाहीर करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
दर जाहीर केलेले कारखाने
साखर कारखान्यांची नावे - दर
१) श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना - २८८५
२) सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना - २८५०
३) विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना - २८००
४) श्री संत कुर्मदास साखर कारखाना - २८५०
५) माळीनगर साखर कारखाना - २८००
६) ओंकार कार्पोरेशन, म्हैसगाव - २८००
७) जकराया साखर कारखाना - ३१५०
८) भैरवनाथ साखर कारखाना - २८००
९) राजवी अॅग्रो पॉवर - २८००
१०) बबनरावजी शिंदे साखर कारखाना - ३००१
११) ओंकार साखर कारखाना, चांदापुरी - २८५०
१२) विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना, करकंब - ३१५०
१३) आष्टी साखर कारखाना - २८५०
१४) सिताराम महाराज साखर कारखाना - २८००
१५) श्री शंकर सहकारी साखर काखाना - २८०० प्लस
१६) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना - २९००
१७) विठ्ठल रिफाइंड साखर कारखाना - २८७५
१८) शिवगिरी अॅग्रो साखर कारखाना - २८७५
१९) येडेश्वरी अॅग्रो कारखाना - ३००१
दर जाहीर न केलेले कारखाने
१) आवताडे साखर कारखाना, नंदूर
२) धाराशिव साखर कारखाना, सांगोला
३) सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना
४) भीमा सहकारी साखर कारखाना
५) व्हीपी साखर कारखाना
६) जयहिंद साखर कारखाना
७) श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना
८) श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना
९) लोकनेते बाबुराव पाटील कारखाना
१०) लोकमंगल अॅग्रो, बीबीदारफळ
११) लोकमंगल, भंडारकवठे
१२) सिद्धनाथ साखर कारखाना, तिऱ्हे
१३) इंद्रेश्वर साखर कारखाना
१४) युटोपियन साखर कारखाना
१५) गोकुळ साखर कारखाना
अधिक वाचा: राज्य शासनाच्या 'या' योजनेतून मिळणार मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण; कुठे आणि कसा कराल अर्ज?
